| कोल्हापूर | प्रतिनिधी |
इतिहास अभ्यासक इंग्रजीत सावंत यांना धमकी देणारा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणार्या प्रशांत कोरटकरचा कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. सरकारी वकील आणि फिर्यादींच्या वकिलांनी महत्त्वाचा युक्तिवाद आजच्या सुनावणीत केला असून, प्रशांत कोरटकर आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. न्यायालयाने गेल्या (दि. 30) सुनावणीत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कोल्हापूरच्या कळंबा कारागृहामध्ये त्याची सध्या परवानगी करण्यात आली होती. यानंतर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी पार पडली असून, दोन्ही बाजूंनी वकिलांकडून जोरदार युक्तिवाद आल्यानंतर जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.