क्रांती भोसलेंना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर

। तळे । वार्ताहर ।
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका क्रांती भोसले यांना नुकताच आदर्श शिक्षिका तसेच अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कारही जाहीर झाला आहे. हे पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून शिक्षक वर्ग, नातेवाईक, समाजबांधव, हितचिंतक यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

रायगड जिल्हा शिंपी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मुळे यांनी महासंघातर्फे त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version