। अलिबाग । प्रतिनिधी ।
अन्वेषण ग्रुप ऑफ मिडियाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी सर्वच क्षेत्रात उल्लेखनिय व कौतुकास्पद कार्य करणार्या 23 महिलांना अन्वेषण ग्रुप ऑफ मिडिया च्या वतीने पहिला राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले प्रेरणा पुरस्कार 2022 देऊन सन्मानित करण्यात आले. यात अलिबाग येथील महिला पत्रकार सुवर्णा दिवेकर यांच्यासह रंजिता काळेबेरे(शिक्षिका), प्राची बोटे(आरोग्य सेविका), शशिकला घोरपडे (अंगणवाडी सेविका), नेत्रदीपा कांबळे(राजकीय व सामाजिक), संजना कोकरेकर(राजकीय व सामाजिक), मंगल लायकर(सामाजिक), अश्विनी माळवदे(पत्रकारिता), सुनीता सुर्वे(सामाजिक व उद्योग), आशाताई गाडीवडर(सामाजिक व उद्योजिका), तेजस्विनी नाईक(शिक्षिका), दीपा झेले(सामाजिक व राजकीय), विमल जाधव(परिचारिका), प्रतिभा हेगडे(सामाजिक व राजकीय), स्नेहल कदम(सामाजिक), वृषाली कोंडुसकर(उद्योजिका), रतन कांबळे(आरोग्य सेविका), माणिक जिरगे(माणिक जिरगे), कुमोदिनी कांबळे(सामाजिक व राजकीय), मुक्ताई वगरे(नगरसेविका), नंदा पाटील(बचत गट), जुलेखा मुल्लाणी(सामाजिक), कमल कुरणे(सामाजिक) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पहार आणि शाल व श्रीफळ असे गौरवाचे स्वरूप होते. हा दिमाखदार सोहळा शनिवारी दि. 19 मार्च रोजी दुपारी 12 वाजता हॉटेल टेम्प्टेशन, झेले चित्रमंदिर समोर, जयसिंगपूर येथे संपन्न झाला. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर हे अध्यक्षस्थानी होते. तर गोकुळचे संचालक माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय कार्याध्यक्षा शीतल करदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.







