उद्या पालीमध्ये कृषीवल हळदीकुंकू समारंभ

सोनी मराठी वाहिनीवरील कलाकारांची उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या दैनिक कृषीवलच्या वतीने पाली येथे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा बुधवारी सायंकाळी चार ते सात यावेळेत पाली-बुरमाळी रोड, धुंडी विनायक नगर, सुरेश खैरे निवासस्थानाजवळ होणार आहे. या कार्यक्रमाला सोनी मराठी वाहिनीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत.

राणी मी होणार या मालिकेतील मल्हार म्हणजे अभिनेता सिध्दार्थ खिराड, मिरा म्हणजे अभिनेत्री संचिता कुलकर्णी, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेतील निरीक्षक विजय भोसले म्हणजे अभिनेता हरीश दुधाडे, उपनिरीक्षक सीमा जमदाडे म्हणजे अभिनेत्री चंद्रलेखा जोशी उपस्थित राहणार आहे.

गेल्या अनेक वर्षांची हळदीकुंकूची परंपरा कृषीवलने जपली आहे. यानिमित्ताने खालापूरमध्ये वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. यंदादेखील 24 जानेवारीला पालीमध्ये हळदीकुंकू समारंभ होणार आहे. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या मालिकेतील सिनेतारकांची उपस्थिती आकर्षण ठरणार आहेत. या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version