मराठी सिनेतारकांच्या उपस्थितीत आज कृषीवल हळदीकुंकू समारंभ

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कृषीवल आयोजित दिवस मानाचा… सौभाग्याचा… हळदीकुंकू सोहळा आज अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात मराठी सिनेतारकांच्या विशेष उपस्थितीत दुपारी चार वाजता रंगणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. यंदा निर्बंधमुक्तीनंतर महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख तथा कृषीवलच्या कार्यकारी संचालक चित्रलेखा पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन प्राप्त करुन दिली आहे.
या हळदीकुंकू कार्यक्रमास सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध महाराष्ट्राची हास्यजत्राफ फेम प्राजक्ता माळी, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब तसेच बॉस माझी लाडाचीफ फेम भाग्यश्री लिमये आणि असे हे सुंदर आमचे घरफ फेम संचिता कुलकर्णी आदी कलाकार उपस्थित राहणार आहेत. या हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांना एक वेगळीच पर्वणी मिळणार आहे

Exit mobile version