लोहा येथील कार्यक्रमास कलाकारांची उपस्थिती
| नांदेड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याप्रमाणेच कृषीवल परिवारातर्फे यावर्षी प्रथमच लोहा, जि. नांदेड येथे महिलांचा सन्मान करण्यासाठी हळदीकुंकू सोहळ्याचे आयोजन सोमवारी (30 जानेवारी) करण्यात आले असून, या सोहळ्यासाठी कलाकारांचे आगमन झाले आहे. यावेळी ‘जिवाची होतिया काहिली’ मालिकेतील श्रुतकीर्ती सावंत, ‘गाथा नवनाथ’मधील मच्छिंद्रची भूमिका जयेश शेवलकर, ‘आशीर्वाद तुझा आई एकविरा आई’मधील मयुरी वाघ यांनी शेकापच्या राज्य महिला आघाडीप्रमुख आशाताई शिंदे यांची भेट घेतली. कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने हा हळदीकुंकू सोहळा दिमाखात साजरा केला जात आहे. गेल्याच आठवड्यात रायगडात अलिबाग, पाली आणि खालापूर या ठिकाणी हजारो महिलांच्या उपस्थितीत हळदीकुंकू सोहळा साजरा आला आहे.