। श्रीगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील मानकुले येथील कृष्णा नारायण पाटील यांचे दि. 24 एप्रिल रोजी अल्पशा आजारे निधन झाले. निधनासमयी ते 70 वर्षांचे होत.े त्यांना भजन किर्तनाची आवड होती, ते सामाजीक कार्यात सहभागी असायचे त्यांचा स्वभाव प्रेमळ व मनमिळाऊ होता त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी 3 मे रोजी भुवनेश्वर-नारिंगी येथे तर उत्तरकार्य राहत्या घरी होणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.