देशात कोठेही आपत्ती ओढवली तर, सढळ हाताने मदत करणार्या रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना आज मदतीची गरज आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथे आलेल्या महापुराने अनेकांचा संसारच उद्ध्वस्त नाही केला, तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपले लोक अस्मानी संकटात सापडले आहेत. तेथील लोकांना आज मदतीची गरज आहे. त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. दोन्ही जिल्ह्यांत शेतीचे, घरांचे तसेच जनावरांचे, प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढे या, कृषीवलच्या जोडीने सामाजिक बांधिलकीचा वसा घ्या..अन् पूरग्रस्तांना मदत करा. तुमच्या मदतीची दखल कृषीवल नक्कीच घेईल. तसेच पारदर्शक व्यवहारासह तुमची मदत थेट पूरग्रस्तापर्यंत पोहोचेल. याशिवाय तुमचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्धही करण्यात येईल. चला तर मग कृषीवलच्या या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊ आणि पूरग्रस्तांना आधार देऊ.
आपण दिलेली अनमोल मदत आम्ही तात्काळ पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवू.
आपण काय देऊ शकता? जीवनावश्यक वस्तू, कपडे, अन्नधान्य, आर्थिक स्वरुपाची मदत
संपर्क :
माधवी सावंत – 9823251800
भारत रांजणकर – 9226152489
हर्षा नाईक – 8380055839
दर्शना पाटील – 8975989010
भैरवी पाटील – 9175708906