• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

पावसाचे रौद्ररूप

Varsha Mehata by Varsha Mehata
July 14, 2021
in अलिबाग, रायगड, संपादकीय, संपादकीय
0 0
0
पावसाचे रौद्ररूप
0
SHARES
269
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जवळपास निम्म्या जगाला वेढणार्‍या मान्सूनचे वर्णन नेहमी ‘काही वेळा अजिबात नाही आणि एकाच वेळी खूप असतो,’ असे केले जाते. हे वर्णन सध्या रायगड जिल्ह्यापासून महाराष्ट्र राज्य, राजधानी दिल्लीसह हिमाचल, उत्तराखंड ही उत्तरेकडील राज्ये अनुभवत आहेत. जूनमध्ये अंदाजानुसार वेळेत आणि अपेक्षेच्या आसपास प्रमाणात व्यवस्थित पाऊस झाला आणि बळीराजा सुखावून गेला. जूनमध्ये रायगड कोंकण परिसरात पेरणीची जोरदार सुरुवात झाली. मात्र जून अखेरीस मान्सूनचा जोर ओसरला आणि शेतकर्‍यांची चिंता वाढली. आणि जुलैच्या प्रारंभीही मान्सूनने जोर न धरल्याने अनेकांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. हवामान खात्याचा जुलैच्या प्रारंभीचा पाऊस पुन्हा वेग धरणार हा अंदाज चुकला. मात्र आठ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रीय होणार असल्याचा अंदाज दिल्यावर त्याच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या. तो अंदाज खरा ठरला आणि त्यानंतर रविवारी हवामान खात्याने दिलेला पावसाचे रूप रौद्र बनणार असल्याचा इशाराही खरा ठरला आणि पावसाने जवळपास सगळ्या नद्या भरल्या. कोकण, रायगडमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले होते ते या अचानक वाढलेल्या पावसाने सगळ्यांची त्रेधातिरपीट उडाली. रविवारी रात्रीपासून राज्याच्या बहुसंख्य भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोकणात बहुतांश भागात दमदार पावसाने 24 तासांत अडीचशे ते साडेतीनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने हजेरी लावली आहे. मात्र नेहमी मुंबईच्या वाट्याला जो अतिरिक्त पाऊस झाल्यानंतर निर्माण होते तशी परिस्थिती सुदैवाने यावेळी निर्माण झालेली नाही. मुंबई एका अर्थी पावसाच्या या नव्या तडाख्यातून वाचली, असेच म्हणायला हवे. मराठवाडा विदर्भात अनेक पिकांच्या पेरण्या रखडल्या होत्या, त्या आता या मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने पुन्हा सुरू होऊ शकतील. महाबळेश्‍वरसह कोल्हापूर, सातारा आदी भागांबरोबरच परभणी, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांतही उत्तम पाऊस झाला आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. नेहमी मान्सूनच्या तावडीत असणार्‍या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशाराही दिला आहे. तरीही काही ठिकाणी दुथडी भरलेल्या नदीने दिसेनाशा झालेल्या रस्त्यावरून बस हाकण्यासारखे अनावश्यक जोखमीचे प्रकार घडले आणि अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील जीर्ण पुल खचल्याने रात्रीच्या काळोखात कोसळला. अरमान सय्यद या तरुणाच्या प्रसंगावधानाने आणि समयसूचकतेने अधिकची प्राणहानी वाचली. एकंदर रायगड जिल्ह्यातील पावसाने काही ठिकाणी दरडी कोसळून रस्ते बंद झाले तर घरांचेही तुरळक प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिले. आणि हा जोर अजून दोन तीन दिवस असणार आहे, हा हवामान खात्याचा अंदाज गंभीरपणे घेणे आवश्यक आहे. यावेळी पावसाने खरा दिलासा दिला तो राजधानी दिल्लीला आणि मोठ्या प्रमाणात हानी घडवून आणली ती हिमाचल प्रदेशात. राजस्थानात वीज पडून कैक जणांचे प्राण गेले. दिल्लीला यंदा पावसाने विलंबाने भेट दिली आणि मुसळधार पावसाने राहिलेली कसर भरून काढली. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस कोसळून पूर येणे हे अनपेक्षित नसले तरी अलिकडच्या काळात तेथे भीषण परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्याला जसे तीव्र होत चाललेल्या मान्सूनचे कारण आहे त्याचप्रमाणे तेथे पर्यटनाच्या वाढलेल्या संधीतून नियोजनअभावी झालेली बेसुमार बांधकाम वाढ हे देखील कारण आहे. गेल्या दोन दिवसांत धर्मशाळा या पर्यटकांचे अलिकडील नवीन आकर्षण केंद्र बनलेल्या भागात अनेक मोटारी तसेच इमारती देखील वाहून गेल्या आहेत. मुसळधार पाऊस कोसळतच असल्याने आणि त्याची तीव्रता अजून काही दिवस कायम राहणार असल्याच्या अंदाजाने पर्यटकांना येण्यास मनाई करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. तेथील हवामानही धोक्याचे बनल्याने विमानतळही बंद ठेवण्यात आला आहे. अनेक हॉटेल्स, इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. तर काही इमारती तर वाहून गेल्याने परिस्थिती हतबल करणारी आहे. कारण, उत्तरेकडील हिमाचल, उत्तराखंड हे भूगर्भीय दृष्टीने जितके संवेदनशील आहेत, तितकेच ते काँक्रिटच्या अतिक्रमणामुळे जोखमीचे बनले आहेत. तशात मान्सून दरवर्षी अधिकाधिक तीव्र होत चालला आहे. अलिकडच्या काळात या प्रदेशावर कोसळलेल्या आपत्तीतून आपण काय धडा घेणार हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

अलिबाग कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरवर हल्ला ; सलाईनच्या स्टँडने फोडला डॉक्टरचा डोळा

Next Post

काशीद पुल तात्काळ दुरुस्त करा ; आ. जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
वणव्यात गवत जळून खाक
रायगड

वणव्यात गवत जळून खाक

March 12, 2026
Next Post
काशीद पुल तात्काळ दुरुस्त करा ; आ. जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा

काशीद पुल तात्काळ दुरुस्त करा ; आ. जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?