• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

सैन्याचे कंत्राटीकरण?

Varsha Mehata by Varsha Mehata
June 16, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

केंद्र सरकारने लष्करातील तरुणांच्या भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील तरुणांनी रस्त्यावर उतरून विरोध केला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली, सध्याच्या काळात हिंदी प्रदेशांमध्ये आंदोलने करणे हे जोखमीचे आहे. एकतर या आंदोलकांवर सध्या सरकारतर्फे राजद्रोहाचे खटले भरले जातात, सार्वजनिक मालमत्तेची नुकसानभरपाई वसुलीसाठी जप्ती आणली जाते किंवा घरे पाडून टाकण्यासाठी थेट बुलडोझर पाठवले जातात. परंतु अशी जोखीम असूनही हे तरूण रस्त्यावर उतरले याचाच अर्थ त्यांचा संताप मोठा आहे. मुजफ्फरपूर, बेगुसराय, अजमेर अशा ठिकठिकाणचे हे तरूण गेल्या तीन-चार वर्षांपासून लष्करात जाण्यासाठी तयारी करत आहेत. या तयारीत अभ्यास जसा आहे तसाच शरीर फिट ठेवण्यासाठीचे व्यायामही आहेत. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची नोकरभरती न झाल्याने यातील काहींची वयोमर्यादा संपत आली आहे. त्यातच आता सरकारने अग्निपथ योजना जाहीर करून त्यांच्या सर्व स्वप्नांवर पाणी टाकले आहे. या योजनेनुसार साडेसतरा वर्षांच्या युवकांची चार वर्षांसाठी भरती होणार आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये 25 हजार तर त्यानंतर सुमारे 21 हजार मुला-मुलींना संधी दिली जाणार आहे. त्यांचे वेतन तीस हजारांवर सुरू होऊन चार वर्षांअखेर ते चाळीस हजार राहील. त्यातही मेख अशी आहे की यातले एकतृतियांश वेतन सरकार निर्वाह निधीसाठी कापून घेणार आहे. चार वर्षांअखेर सरकार या निर्वाह निधीत तितकीच भर घालून सुमारे बारा लाख रुपये उमेदवाराला देऊन सेवेतून नारळ देईल. म्हणजे वयाच्या बाविसाव्या वर्षी सैन्याचा चार वर्षांचा अनुभव अधिक बारा लाख रुपये अशी शिदोरी तरुणांकडे असेल. त्याला माजी सैनिक म्हणून कोणतेही पेन्शन किंवा इतर लाभ मिळणार नाहीत. एकूण भरती केलेल्यांपैकी 25 टक्के जवानांना त्यांच्या कामगिरीच्या आधारे आणखी काही वर्षांसाठी सैन्यात नोकरी करता येईल. पण ही नोकरी किती काळासाठी असेल हे सध्या स्पष्ट नाही. एक चांगला लष्करी जवान तयार होण्यासाठी चार वर्ष हा खूपच कमी काळ आहे. शिवाय, या जवानांकडे हंगामी म्हणून पाहिलं जाणार असल्याने त्यांच्या प्रशिक्षणाबाबत फार कडवी मेहनत घेतली जाणार नाही अशीही शक्यता आहे. अशा स्थितीत बाविसाव्या वर्षी जेव्हा ते बाहेर पडतील तेव्हा ना धड लष्करी, ना धड मुलकी अशी त्यांची अवस्था होणार. सतराव्या वर्षी दाखल झालेले असल्याने त्यांच्याकडे कोणतीही पदवी नसणार. बाविसाव्या वर्षांनंतर त्यांना पुढचे शिक्षण किंवा नोकरी यांचा विचार करावा लागणार. शिवाय, लष्करातून चार वर्षांनंतर काढले गेलेले जवान असा एक शिक्का त्यांच्यावर बसणार. त्यामुळे ही भरती म्हणजे सरकारने नोकर्‍यांच्या व लष्करी सेवेच्या नावावर केलेली तरुणांची मोठी फसवणूक ठरण्याची शक्यता अधिक. किंवा विरोधकांनी म्हटल्याप्रमाणे या जवानांचा उपयोग राजकारणातले गुंडपुंड नेते, बडे उद्योगपती यांचे सुरक्षा कर्मचारी म्हणून किंवा धार्मिक प्रश्‍नांवर हिंसाचार करणार्‍या संघटनांमध्ये भाड्याचे कार्यकर्ते म्हणून होण्याचीही शक्यता आहे. सध्या अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठीची तरतूद सव्वापाच लाख कोटी रुपये आहे. त्यातील सुमारे वीस टक्के रक्कम निव्वळ माजी जवानांच्या पेन्शनवर खर्च होते. त्यामुळे तो खर्च कमी करण्याचा सरकारमागे तगादा आहे हे समजण्यासारखे आहे. चीनने गेल्या काही वर्षांत आपले लष्कर चाळीसवरून वीस लाखांवर आणले आहे व तिथे अधिकाधिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. इथेही हे करायला हरकत नाही. परंतु त्यासाठी सरकारने जी योजना आणली आहे ती हजारो तरुणांच्या आयुष्याशी खेळणारी आहे. दुसर्‍या बाजूने, या योजनेमुळे देशाची संरक्षण व्यवस्था बांधिलकी व तयारी कच्ची असलेल्या कंत्राटी सैनिकांच्या जिवावर सोडून दिली जाण्याचा धोका निर्माण होणार आहे. हे गंभीर आहे. एरवी सरकारला कोणत्याही मुद्दयावर पाठिंबा देणार्‍या जी. डी. बक्षी यांच्यासारख्या माजी सेनाधिकार्‍यांनीही याच मुद्द्यावर या योजनेला विरोध केला आहे. पूर्वीचे लष्करप्रमुख आणि सध्या मोदी सरकारात असलेले मंत्री व्ही.के.सिंग यांनीही या योजनेच्या आखणीत आपला सहभाग नव्हता असे सांगून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केलेली आहेच.  

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

अलिबाग तालुक्यात सहा कोरोना रूग्ण तर एक कोरोना मुक्त

Next Post

तालिबानसोबतची बैठक महत्त्वपूर्ण

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
तालिबानसोबतची बैठक महत्त्वपूर्ण

तालिबानसोबतची बैठक महत्त्वपूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?