• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

विरोधकांसाठी संधी

Varsha Mehata by Varsha Mehata
June 17, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
96
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नरेंद्र मोदींची आणि भाजपच्या हिंदुत्वाची लोकप्रियता देशात नक्कीच आहे. पण ती आहे त्याहून नेहमीच अधिक भासत असते याचे कारण क्षीण विरोधक. मोदी यांच्या पंतप्रधानकीच्या आठ वर्षांच्या काळात राज्यांमध्ये विरोधकांनी थोडी फार ताकद दाखवली तरी अखिल भारतीय पातळीवर त्यांचा आवाज दिवसेंदिवस कमी होत गेलेला दिसतो. जितके पक्ष तितक्या त्यांच्या तर्‍हा आहेत. उदाहरणार्थ काप गेले आणि भोके राहिली तरीही राज्यकर्ता पक्ष असल्याची काँग्रेसची गुर्मी कायम आहे. तेलंगणा राष्ट्र समितीचे चंद्रशेखर राव, बीएसपीच्या मायावती आदी नेत्यांचे अहंकार तीव्र आहेत. तर नवीन पटनाईक आणि जगनमोहन रेड्डी यांना त्यांच्या राज्यात भाजपवाले भिडलेले असले तरीही अजूनही काँग्रेस हाच त्यांना आपला मुख्य शत्रू वाटतो. दिल्लीचे मुख्यमंत्री असल्याने देशपातळीवरचे नेतृत्वही आपल्याकडेच आले पाहिजे असे अरविंद केजरीवालांना वाटते. यंदाच्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे चित्र थोडेसे बदलेल अशी आशा निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जींनी दिल्लीमध्ये या संदर्भात बोलावलेल्या बैठकीला काँग्रेससह जवळपास सतरा पक्षांनी हजेरी लावली किंवा पाठिंबा दिला. काँग्रेस, डावे आणि ममता यांच्यात बंगालमध्ये अद्यापपर्यंत विस्तव जात नव्हता. बंगालमधील गेल्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसप्रणीत यूपीए आता शिल्लक उरलेले नाही असे वक्तव्य ममतांनी केले होते. तर त्याच निवडणुकीत ममतांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टोकाचे हल्ले केले होते. पण आता दोन्ही बाजूंना शहाणपण आलेले दिसते. ममतांच्या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आदी नेते हजर होते. डाव्यांनीही आता वस्तुस्थिती मान्य केलेली दिसते. दुसरीकडे बंगालमधील विजयानंतर ममता यांचा राष्ट्रीय नेतेपदाचा जो एक तोरा होता तोही कमी झालेला दिसतो. गोव्यातील दारुण पराभव, केजरीवाल यांनी दिल्लीसह पंजाबात मारलेली जबरदस्त मुसंडी आणि खुद्द बंगालमध्ये सुरु असलेल्या अनेक कुरबुरी यामुळे ममता यांचा सूर नरमलेला दिसतो. राष्ट्रपतिपदासाठी आरंभी शरद पवार यांचे नाव चर्चेत होते. आश्‍चर्य म्हणजे काँग्रेस व आम आदमी पक्षाने त्यांना तात्काळ पाठिंबा दिला. आम आदमी पक्षाचे संजय सिंग खास त्याबाबत चर्चेसाठी मुंबईत येऊन गेले. याच पक्षाने पूर्वी पवारांवर भ्रष्टाचारी म्हणून टोकाची टीका केली होती. पण आता तोही राजकारणाचा खेळ समजू लागलेला दिसतो. पवार हे खरोखरच देशात सर्व पक्षांना मान्य होऊ शकतील असे एकमेव ज्येष्ठ नेते आहेत. राजकारण आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि शेतीपासून आयपीएलपर्यंत अनेक क्षेत्रातली त्यांची कर्तबगारी सर्वांसमोर आहे. मात्र खुद्द पवार यांनी हा प्रस्ताव तडक नाकारला. त्याची दोन कारणे स्पष्ट आहेत. एक म्हणजे कितीही जुळवाजुळव केली तरीही भाजपकडे असलेली सत्ता, इडी, सीबीआय इत्यादींची ताकद लक्षात घेता विरोधकांचा पराभव होण्याची शक्यता अधिक आहे. आजवर फार क्वचित निवडणुका हरलेले पवार या टप्प्याला पराभवाचा शिक्का माथी घ्यायला तयार नसणार हे समजण्यासारखे आहे. दुसरे म्हणजे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकून राहण्यात पवारांची भूमिका मध्यवर्ती आहे. एकीकडे काँग्रेस आणि दुसरीकडे सेना यांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये पवारांच्या व्यवहारी राजकारणाचा मोठा हात आहे. राष्ट्रपतिपदासाठी उमेदवार झाले तर त्यांना ही भूमिका सोडून द्यावी लागेल. त्यामुळे आता फारुख अब्दुल्ला, गोपाळकृष्ण गांधी अशांची नावे पुढे येत आहेत. पुढील आठवड्यात पुन्हा बैठक होणार आहे. नाव कोणतेही ठरले तरी या निमित्ताने होत असलेले विरोधकांचे ऐक्य ही अत्यंत आशादायक व महत्वाची बाब असेल. काश्मीर, चीन, महागाई, बेकारी अशा प्रश्‍नांबाबत मोदींवर टीका केली की त्यांचे भक्त, ‘पण त्यांना पर्याय आहेच कोण,’ असा सवाल करत असतात. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे देशव्यापी ऐक्य घडलेले दिसले तर त्या प्रश्‍नाला परस्पर उत्तर मिळून जाईल. या लढतीत हार होणार असली तरीही देशव्यापी पर्याय निर्माण करण्याच्या जबाबदारीचे विरोधकांनी भान ठेवले पाहिजे. त्यातूनच लोकांच्या मनात विश्‍वास तयार होईल. भाजपला सुखासुखी विजय मिळवता आला नाही तर ती त्यांची मोठी कमाई असेल.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

गो.म. वेदक विद्यामंदिरचा निकाल 96.70 टक्के

Next Post

शासकीय दाखले वेळीच काढून ठेवा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
…तर पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू!

शासकीय दाखले वेळीच काढून ठेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?