• Login
Sunday, March 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

अंतर्गत नादारी, खुणावते दिवाळखोरी

Varsha Mehata by Varsha Mehata
May 2, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
0
SHARES
168
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

हेमंत देसाई

अंतर्गत प्रश्‍नांमुळे मेटाकुटीला आलेल्या पाकिस्तानने रमजानच्या पार्श्‍वभूमीवर अस्वस्थतेचे दुर्दैवी पर्व अनुभवले. आज हा देश व्यापार उदीम, राजकीय, सामाजिक संदर्भात भारताची बरोबरी करु शकत नाही. एकाच इतिहासाचे, संस्कृतीचे वारसदार असलेल्या या दोन देशांची तुलना केली असता असंगाशी संग करत पाकिस्तानने काय अवस्था करुन घेतली, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या विद्यार्थ्यासाठी अभ्यासाचा विषय ठरावा!

भारतासाठी पाकिस्तानचा विषय जणू संपल्यात जमा आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर भारताची फार मोठी कुरापत काढण्याची क्षमता या राष्ट्राकडे उरलेली नाही. व्यापार उदीमाच्या अनुषंगाने हे राष्ट्र भारताची कोणतीही वाट अडवू शकत नाही. राजकीय, सामाजिक संदर्भात या राष्ट्राची भारताशी बरोबरी होऊ शकत नाही. आणि दहशतवादाला प्रोत्साहन द्यायचे म्हणाल तर त्या पातळीवरही पाकिस्तानची ताकद कमी कमी होत गेली आहे. इतकी की, हे अतिरेकी पाकिस्तानसाठी गंभीर धोका बनले आहेत. एकुणच भारताने पाकिस्तानकडे फारसे लक्ष द्यावे अशी परिस्थिती उरलेली नाही. मात्र, एकाच इतिहासाचे, संस्कृतीचे वारसदार असलेल्या या दोन देशांमधल्या लोकांची तुलना केली असता असंगाशी संग करत पाकिस्तानने स्वत:ची काय अवस्था करुन घेतली, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या कोणाही विद्यार्थ्यासाठी अभ्यासाचा विषय ठरावा, अशी परिस्थिती आहे. ज्या क्रमाने पाकिस्तान कोसळत गेला आणि आज गुडघ्यावर येऊन बसला, ते पाहता भारतीय नागरिक किती मोठ्या आत्मसन्मानाने जगत आहेत, असे क्षणभर वाटण्यासारखी स्थिती आहे. आज पाकिस्तानमध्ये जणू काहूर माजले आहे. हा देश वेगाने दिवाळखोरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. प्रत्येक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय अर्थसंस्थेकडून तो कर्जाची आस बाळगून आहे. अनेक देशांना आर्थिक मदतीसाठी साकडे घालत आहे. राष्ट्र म्हणून जे काही विकता येईल ते विकण्याची तयारी करत आहे. अगदी पंतप्रधानांच्या ताफ्यातल्या गाड्याही विकून झाल्या आहेत.
रमजानच्या महिन्यात पाकिस्तान महागाईच्या विळख्यात वाईट पध्दतीने अडकल्याचे पहायला मिळाले. महागाईचा दर 35 टक्क्यांचा आकडा पार करत असताना नागरिक अक्षरश: हताश झाल्याचे दिसले. गेल्या बारा महिन्यांमध्ये 47 टक्क्यांनी वाढलेल्या अन्नधान्याच्या किंमती आणि वाहतूक साधनांमध्ये झालेली 55 टक्क्यांची वाढ इथल्या सामान्यजनांचे जिणे किती दुरापास्त झाले असेल, याची चुणूक दाखवते. रमजानच्या पवित्र महिन्यात इथला बाजार खरेदी-विक्रीचे नवे विक्रम नोंदवतो. सर्वांच्याच उद्योगधंद्यांना मोठी बरकत येते.यंदा मात्र सारे काही जणू थिजून गेले. इथे ना ग्राहक आहेत ना नफ्याची आशा करणारे विक्रेते. नफ्याची बात सोडा, दुकांनांचे भाडे देण्याचीही क्षमता व्यापारी-व्यावसायिक वर्ग हरवून बसलेला दिसला. घरासाठी पीठ खरेदी करणेही अवघड बनले. या देशासाठी हा महिना इतका रुखासुखा ठरला की पाकिस्तान पुढील काळात महागाई, दरवाढ या बाबतीत किती गंभीर परिस्थितीला सामोरे जाणार आहे, याचा अंदाज येत आहे. जणू काही अल्ला या देशाला केलेल्या दुष्कृत्यांची शिक्षा देत असावा.आणि हे इथे भारतात बसून बोलले जात आहे असे नव्हे तर, दस्तुरखुद्द पाकिस्तानी राजकारणीही आपण केले ते अंमळ चुकलेच, या शब्दांमध्ये केल्या चुकांची कबुलीही देत आहेत.
कायदेशीर संकटात सापडलेले पाकिस्तानचे नेते आणि माजी पंतप्रधान इमरान खान हे सत्तेत असताना आणि त्या आधीही सतत भारताच्या विरोधात गरळ ओकत असत. परंतु अलिकडे त्यांनी अचानक भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले. ‘क्वाड’चे सदस्य असूनही अमेरिकेच्या दडपणापुढे न झुकता भारताने रशियाकडून कच्चे तेल मिळवले. माझ्या सरकारकडूनही अशाच प्रकारे स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू होते’, असे इमरान यांनी म्हटले. 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी, मोदी हेच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा इमरान यांनी व्यक्त केली होती. पाकिस्तानच्या कोणत्याही पंतप्रधानाने भारतातील एखादा नेता पंतप्रधान व्हावा, याबद्दल पूर्वी कधीही भाष्य केले नव्हते. इमरान यांनी मोदी यांची भाटगिरी करण्यामागे त्यांचा स्वतःचा काही अजेंडा असणारच. परंतु इमरान यांना पाकिस्तानची अर्थव्यवस्था सांभाळता आली नाही आणि आता शाहबाज शरीफ पंतप्रधान असताना पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा पूर्णपणे बोर्‍या वाजला आहे.
2013 च्या अखेरीस जगात मंदी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेपासून मंदीची ही लाट सुरू होईल, असा अंदाज आहे. परंतु पाकिस्तानमध्ये आताच मंदी आली असून महागाईचा दर 35 टक्क्यांवर गेला आहे. पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेने कर्जावरील व्याजदर तब्बल 100 अंशांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून या बँकेचा किमान व्याजदर 21 टक्के झाला आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाने 280 रुपयांपर्यंत गटांगळी खाल्ली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकमध्ये अन्नधान्याची मदत मिळवण्यासाठी जमलेल्यांची चेंगराचेंगरी होऊन 16 जणांचा मृत्यू झाला. केवळ एक-दोन किलो पिठासाठी लोक हाणामार्‍या करत आहेत, हे चित्र भयंकर आहे. सोविएत रशिया विस्कटला, त्यावेळी तेथेही ठिकठिकाणी पावासाठी अशाच रांगा लागलेल्या असत. भारताची अर्थव्यवस्था बरी असताना, आपल्याशी बरोबरी करू पाहणार्‍या पाकला आता आपली स्वतःची खरी लायकी काय आहे, ते नक्कीच कळाले असेल. 1965 नंतर पाकिस्तानमध्ये कधीही अन्नधान्याची इतकी महागाई झाली नव्हती. मालवाहतुकीच्या भाड्यातच 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या परिस्थितीत पाकिस्तानला तातडीने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 100 कोटी डॉलर्सच्या कर्जाची गरज आहे. हा निधी न मिळाल्यास पाकिस्तान दिवाळखोर होईल. अशा वेळी आंतरराष्ट्रीय बाजारातून पाकिस्तानला कोणीही कर्ज देणार नाही. आत्ताच या देशामध्ये भीषण परिस्थिती असताना, दिवाळखोरीनंतर तर देशाची अन्नान्न दशा होईल अशी शक्यता आहे. इस्पितळात लोकांना औषधे मिळणार नाहीत, उपासमारी आणि कुपोषणाने हजारोंचा मृत्यू होईल.
आधीच गॅसची टंचाई असल्यामुळे या राष्ट्रातल्या लाखो गृहिणींची पंचाईत झाली आहे. रमझानच्या या महिन्यात दिवसभर लोक उपास करतात. परंतु संध्याकाळीही खायला न मिळाल्यास लोकांची स्थिती काय होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी. कराचीमध्ये नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक मातांचा मृत्यू झाला. रमझानमध्ये व्यापारी, कारखानदार आणि अन्य श्राीमंत व्यक्ती लोकांना अन्नाची पाकिटे  फुकटवाटत असतात. ही पाकिटे घेण्यासाठी सर्वत्र गर्दी ओसंडून वाहत आहे. पाकिस्तानमध्ये भीषण आर्थिक विषमता असून एकूण व्यवस्था सरंजामशाही स्वरूपाची आहे. अचानक ओढवलेल्या आर्थिक हलाखीमुळे असंख्य लोकांना दहा किलोच्या पिठाच्या पोत्यासाठी हजार हजार रुपये देणे परवडत नाही. देशातील मोबाईल जुळणीचे बहुतेक कारखाने बंद पडलेले आहेत. शिवाय इतर अनेक कारखान्यांची शटर्स बंद असून कामगारांना निम्माच पगार मिळत आहे. कापड गिरण्यांप्रमाणेच मोबाईल जुळणी कारखान्यांसाठी बँकांकडून पतपत्रे दिली जात नाहीत. घेतलेली रक्कम परत केली जाईल, अशी हमी देणारी ही पत्रे असतात. ती मिळाल्याशिवाय उत्पादन सुरू ठेवणे अशक्य आहे.
भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश असून एकमेकांबरोबर शांततेत राहणे जरूरीचे आहे. आम्ही भारतासोबत तीन युद्धे लढलो. परिणामी, पाकिस्तानमध्ये गरिबी आणि बेरोजगारीच्या समस्या तीव्र झाल्या. त्यामुळे आम्ही आमचा धडा शिकलो आहोत, अशी कबुली पंतपधान शाहबाज शरीफ यांनी यापूर्वीच दिली आहे. आम्हाला आमच्या लोकांना शिक्षण, आरोग्य सुविधा आणि नोकर्‍या द्यायच्या आहेत. आम्ही आमची संसाधने बाँब आणि दारूगोळ्यावर वाया घालवू शकत नाही, असे उदगार त्यांनी काढले होते. पाकिस्तानला बर्‍याच लवकर ही उपरती झाली म्हणायची! विशेष म्हणजे, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी, भारत हा शक्तिशाली देश आहे आणि अमेरिका व रशिया भारताच्या पाठीशी उभे आहेत, असे मत व्यक्त करून भारताची प्रशंसा केली आहे. वास्तविक, अण्वस्त्रसज्ज राष्ट्र असूनही पाकिस्तानला कटोरा घेऊन सगळीकडे कर्जासाठी हिंडावे लागत आहे. ही उधारउसनवारी करणे हे अवमानास्पद वाटते, अशी भावनाही शाहबाज यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या डोक्यावर वेगवेगळ्या देशांचे आणि अर्थसंस्थांचे मिळून 100 अब्ज डॉलर्स एवढे कर्ज आहे. 2023 मध्येच त्यांना त्यापैकी 21 अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे आणि पुढच्या तीन वर्षांमध्ये उरलेले 70 अब्ज डॉलर्सचे कर्ज परत करावे लागेल. आज पाकिस्तानकडे केवळ 4.3 अब्ज डॉलर्स इतकीच विदेश चलनाची गंगाजळी आहे. गेल्या दहा वर्षांमधली ही नीचांकी अवस्था आहे.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

पवारांचे नवे राजकारण

Next Post

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एक जण ठार

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एक जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?