• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

मन की बात- बोलाचाच कढी-भात

Varsha Mehata by Varsha Mehata
May 8, 2023
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

श्रीरंजन आवटे

या सर्व तथ्यांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांचे नऊ वर्षे दुतर्फी संवाद, प्रश्‍नोत्तरे, पत्रकार परिषदा यांना दूर ठेवून एकतर्फी मन की बात करत राहाणे, हे फार वरवरचे, दिखाऊ वाटते. शिवाय, ’मन की बात’ मध्ये बोलतानाही मूलभूत मुद्द्यांना न भिडता लोकांना बोलाचाच कढी-भात भरवत राहाणे ही तर रंगसफेदीच. बेटी बचा बेटी पढाओचे कढ काढायचे आणि मूळ समस्या सोडवायच्या नाहीत ही निव्वळ प्रतिकात्मता. 

आप हो सके तो बेटियों को बचाओ
हम बलात्कारियों को बचाऐंगे !
: मोदी सरकारची ’मन की बात’
————————–
महिला खेळाडू म्हणतात, आमचं लैगिंक शोषण होतं आहे. पोलीस ऐकत नाहीत, तक्रार नोंदवून घेत नाहीत.
ऋखठ नोंदवून घ्यावा, याकरता सर्वोच्च न्यायालय गाठावं लागतं !
कथित आरोपी असलेला भाजप खासदार राजीनामा देत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही. चौकशी होत नाही.
या महिला खेळाडूंचं ट्रोलिंग होतं. त्यांना धमकावलं जातं. पोलीस त्यांच्यासोबत गैरव्यवहार करतात.
या महिला खेळाडूंच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस ताब्यात घेतात. फरफटत नेतात.
आता महिला खेळाडू म्हणताहेत,
आम्ही आमची मेडल्स परत करणार आहोत! बिलकीस बानोच्या बलात्कार्‍यांंची सुटका होते तेव्हा त्यांना सन्मानित केलं जातं, स्वागत केलं जातं त्यांचं. अशा भयंकर देशात आपण राहतो आहोत. माझ्या देशातले संवेदनशील नागरिक का गप्प आहेत? विशेषतः महिला का गप्प आहेत?
आपल्या लेकीबाळी असत्या तर तुम्ही अशाच शांत बसला असता का?

3 ऑक्टोबर 2014 च्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ चा पहिला भाग लोकांनी कला, तेव्हा मोदीजी कम्युनिकेशनची जुनी शैली न वापरता स्वतःची नवी शैली निर्माण करत आहेत असे त्याचे कौतुक केले गेले. त्यांनी ’मन की बात’ मध्ये जनतेशी हितगुज केले. तेव्हा ते नवे पंतप्रधान होते. त्यांच्या कथनीवर बहुसंख्य लोक भाळले होते. कालांतराने लक्षात येऊ लागले की, कथनी कितीही भारावून टाकणारी असली, तरी शेवटी करनीच महत्वाची आहे. करनी तर दूरच राहिली. इथे कथनीदेखील स्वतःच्या मतलबापुरती आहे, हेही लक्षात येऊ लागले. त्यामुळे 30 एप्रिल रोजी प्रक्षेपित होणार्या शंभराव्या ‘मन की बात’च्या निमित्ताने काही प्रश्‍न मांडणे, काही तथ्ये नोंदवणे गरजेचे वाटते.
शंभर वेळा ‘मन की बात’ करणार्‍या पंतप्रधानांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. पत्रकारांशी त्यांची भेटगाठ, संवादच नाही. असे का? त्यांना एकतर्फीच संवाद हवा आहे की, त्यांना पत्रकार परिषदेला सामोरेच जायचे नाही? पत्रकारिता, माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ समजली जातात, हे ते मानतात का? भारत ही लोकशाहीची जननी आहे, असे ते वारंवार सांगत असतात, ती निव्वळ कथनीच असते का?
आजवर एकूण शंभर कोटी लोकांनी ‘मन की बात’ कले, असे आयआयआयएम रोहटकने प्रसारभारतीच्या सांगण्यावरून केलेले सर्वेक्षण म्हणते. तरीही शंभराव्या भागाची प्रचंड प्रमाणावर जाहिरात करण्यात येत आहे. ते कले जावे यासाठी शासकीय यंत्रणा पणाला लावली गेली आहे. शंभरहून अधिक संख्येने असलेली आकाशवाणी, दूरदर्शन केंद्रे, सरकारची अंकित खाजगी माध्यमे तर याचे प्रसारण करतातच. आता शंभरावा भाग देशातील सर्व कम्युनिटी रेडिओंना प्रसारित करण्याचा, तसे केल्याचा पुरावा केंद्राकडे पाठवण्याचाही आदेश निघाला आहे. शंभराव्या भागाचे प्रसारण सर्व ठिकाणी समारंभपूर्वक केले जावे, लोकांना गोळा करून ते कवावे, त्याचे फोटोही पुरावा म्हणून केंद्राला पाठवावेत, असेही निर्दश आहेत. सर्व दूतावास, केंद्र सरकारचे आणि जिथे भाजपची सरकारे आहेत त्या राज्यांतल सर्व विभाग, तिथले मंत्री, कर्मचारी, भाजपच्या सर्व शाखा, नेते, कार्यकर्ते यांनादेखील सूचना दिल्या गेल्या आहेत. श्रवणानंदासोबत नाश्त्याची व्यवस्था करत लोकांची जिव्हातृप्तीही करण्याचे ठरले आहे. अशी इव्हेंटबाजी पंतप्रधानांच्या प्रत्येकच कार्यक्रमात होत असते. मूळ मुद्दे झाकण्यासाठी हा भरजरीपणा केला जातो का?
‘मन की बात’ हे 55 भारतीय आणि 11 विदेशी भाषांतून कवले जाते. परंतु कणार्यांची भाषावार संख्या उपलब्ध नाही. उडऊड लोकनीती या संस्थेने ’मन की बात: रिलिटी चेक’ या नावाने एक अध्ययन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार या कार्यक्रमाला फारच कमी प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे 85 कोटी लोकांनी ‘मन की बात’ कलेलेच नाही, असे या अध्ययनात म्हटले आहे.
अन्य निरीक्षणे अशी – दक्षिण भारतात 75%, हिंदी भाषा नसलेल्या राज्यांत 62%, हिंदी भाषिक प्रदेशात 50% आणि उत्तर भारतात 54% लोकांनी ’मन की बात’ कलेले नाही. भाजपकडे कल असलेल्या 51% लोकांनी हा कार्यक्रम एकदाही कलेला नाही, तर 21% लोकांनी तो एकदा तरी कला आहे. काँग्रेसकडे कल असलेल्या 68% लोकांनी कलेला नाही आणि 18% लोकांनी एकदा वा दोनदा कला आहे. याच निरीक्षणांशी मिळती-जुळती माहिती पत्रकार रवीशकुमारने पंतप्रधानांच्या आणि भाजपच्या युट्युब चॅनलच्या लाइक्स, व्ह्यूज आदींच्या संख्येवरून मांडली आहे. इथे ’मन की बात’ च्या केंद्रीय अर्थसंकल्पासंबंधित भागावरील कॉमेंट्सचा विभाग बंदच केला आहे. ऑगस्ट 2020 च्या भागावर दहा लाखांहून अधिक डिसलाइक्स आहेत. कोविडकाळात नीट आणि जेईई परीक्षा घेतल्याचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी हे डिसलाइक करण्याचे आंदोलन केले होते.
‘मन की बात’ सुरू झाल्याझाल्या त्याच्या प्रायोजकत्वापोटी आकाशवाणीला चांगला महसूल मिळू लागला होता. त्यातही आता 90% ने घट झाली आहे. हा कार्यक्रम प्रायोजित करणार्‍यात शासकीय विभागच अधिक आहेत. म्हणजे या कार्यक्रमासाठीचा सगळा खर्च करदात्या नागरिकांकडूनच केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रायोजकांच्या यादीत निवडणूक आयोगदेखील आहे. ही माहिती संसदेतील प्रश्‍नोत्तरांत नमूद आहे.
‘मन की बात’ सुरू करताना पंतप्रधान म्हणाले होते की, अगदी सामान्यातल्या सामान्यापर्यंत पोचायचे असल्याने रेडिओचे माध्यम निवडले आहे. पुढे म्हटले गेले की, या कार्यक्रमामुळे आकाशवाणीची लोकप्रियता वाढली. तरीही सरकारने डबघाईला आलेल्या आकाशवाणी, दूरदर्शनच्या दुरावस्थेकडे लक्ष दिलेले दिसत नाही. आकाशवाणीतल्या मंजुर पदांची संख्या 26,129 आहे. आणि रिक्त पदे आहेत 13,966. दूरदर्शनमधल्या मंजुर पदांची संख्या 19,662 आहे. रिक्त पदे आहेत 12,420. या खेरीज दोन्ही संस्थांत काम करणार्यांचे असंख्य प्रश्‍न आहेतच.
‘मन की बात’ मध्ये देशातल्या मुलींच्या भवितव्याबद्दल भावव्याकुळकपणे बोलले जाते. आणि महिला-मुलींवर होणार्‍या अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणांबद्दल मात्र मौन बाळगले जाते. असे का? महिला कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप, त्यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा हे प्रकरण गाजते आहे. या विरोधात सध्या दिल्लीत सहकार्यांसह आंदोलन करणार्‍या कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट यांनी मोदीजींना विनंती केली आहे की, शंभराव्या ’मन की बात’ मध्ये या विषयावर, खेळाडूंच्या संघर्षाबद्दल बोलावे. ही विनंती पंतप्रधान मानतील का?
या सर्व तथ्यांच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांचे नऊ वर्षे दुतर्फी संवाद, प्रश्‍नोत्तरे, पत्रकार परिषदा यांना दूर ठेवून एकतर्फी मन की बात करत राहाणे, हे फार वरवरचे, दिखाऊ वाटते. शिवाय, ’मन की बात’ मध्ये बोलतानाही मूलभूत मुद्द्यांना न भिडता लोकांना बोलाचाच कढी-भात भरवत राहाणे ही तर रंगसफेदीच. बेटी बचा बेटी पढाओचे कढ काढायचे आणि मूळ समस्या सोडवायच्या नाहीत ही निव्वळ प्रतिकात्मता. आणि अशा प्रतिकात्मक ’मन की बात’ च्या शंभराव्या भागाचा गवगवा करण्याला प्रोपगंडा नाही तर काय म्हणायचे?
कथनी है इक थोथा (खोटा) धंधा,
कर कर गए सब हार,
अमल बिना यह जीवन प्यारे,
हो जाए दुश्‍वार ॥
– अभ्यासू महाराष्ट्रीय
(फेसबुकवरुन साभार)

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

मणिपूरमधील भडका

Next Post

भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची एसटीला धडक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची एसटीला धडक

भीषण अपघात! मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची एसटीला धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?