• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

‘ऑकस’ कराराचं कवित्व!

Varsha Mehata by Varsha Mehata
September 30, 2021
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
‘ऑकस’ कराराचं कवित्व!
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा.डॉ. विजयकुमार पोटे

चीनला एकाकी पाडण्यासाठी भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाने क्वाड करार केला. आता पुन्हा अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ‘ऑकस’ हा सुरक्षा करार करण्यात आला आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान आणि सायबर भागीदारीचा समावेश आहे. चीनने या कराराला आक्षेप घेत चिडचिड केली; परंतु त्यापेक्षाही युरोपीयन संघ आणि फ्रान्सने ऑकस करारावर घेतलेला आक्षेप जास्त चर्चेचा ठरला आहे.
चीनचे अध्यक्ष, भारताचे पंतप्रधान आदी नेते दीड वर्षानंतर विदेश दौर्‍यावर असताना ऑकस करारावरून जागतिक वादंग निर्माण झालं आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियानं क्वाड करार केला आहे. हा करार चीनला एकाकी पाडण्यासाठी करण्यात आला असताना आता पुन्हा अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरक्षा करार करण्यात आला. त्याला ‘ऑकस’ असं नाव देण्यात आलं आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान आणि सायबर भागीदारीचा समावेश आहे. चीनने या कराराला आक्षेप घेणं स्वाभावीक होतं. तशी आदळआपट त्या देशानं केली; परंतु त्यापेक्षाही युरोपीयन संघ आणि फ्रान्सने ऑकस करारावर घेतलेला आक्षेप जास्त चर्चेचा ठरला आहे. या कराराच्या निमित्तानं ‘पाठीमागून हल्ला’ केल्याचा आरोप फ्रान्सने ऑस्ट्रेलियावर केला आहे. भारत आणि जपानप्रमाणेच ऑस्ट्रेलियाही ‘क्वाड’ देशांमध्ये सहभागी आहे; परंतु या दोन्ही देशांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याचं नमूद करून चीनने भारत आणि जपानला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ऑकस कराराचा जपान आणि भारतावर मानसिक परिणाम होईल, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलिया हे अमेरिकेच्या हिंद-प्रशांत महासागरातल्या रणनीतीचं केंद्र आहे. त्याच्या पश्‍चिमेकडे हिंदी महासागर आणि पूर्वेकडे पॅसिफिक महासागर आहे. उत्तर गोलार्धात अमेरिकेचे अनेक लष्करी तळ आणि मित्रराष्ट्रं आहेत; परंतु दक्षिण गोलार्धात त्याची जागतिक धोरणात्मक युती तुलनेनं कमकुवत दिसते. ऑकस करारानुसार ऑस्ट्रेलियाला हिंद-प्रशांत क्षेत्रात अण्वस्त्रचालित पाणबुड्या उपलब्ध होतील. या वेळी अमेरिकेने ऑस्ट्रेलियाबरोबर राजकीय भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी ऑकस कराराच्या माध्यमातून पाऊल उचललं आहे. या करारावर भारताने काहीच प्रतिक्रिया दिली नसताना अचानक भारतप्रेमाचा कळवळा आल्याच्या थाटात चीनने या कराराद्वारे अमेरिका भारताला अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा सूर लावला आहे. आपलं आशिया-पॅसिफिक धोरण पश्‍चिमेकडे हिंदी महासागरापर्यंत पसरवणं हे अमेरिकेचं मुख्य उद्दीष्ट आहे. भारत आपल्या ‘अ‍ॅक्ट ईस्ट’ धोरणाला महत्त्व देतो. अमेरिका आणि भारत यांचे सुरक्षेसारख्या काही मुद्यांबाबत समान हितसंबंध आहेत; परंतु तरीही अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. ऑकस करार हा त्यापैकीच एक मतभेदाचा मुद्दा असू शकतो; परंतु भारताने त्याबाबत आकांडतांडव केलेलं नाही.
चीनच्या सरकारी माध्यमाने ऑकस कराराचा संबंध जोडून भारताला अमेरिकेपासून चार हात दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ऑकस करारानुसार तांत्रिक आणि आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या भागीदारीवर सहमती दर्शवण्यात आली आहे. या करारानुसार अमेरिका ऑस्ट्रेलियाला आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी मदत करू शकतं. तसंच आशियात ‘गार्ड डॉग’ बनवण्यासाठीही मदत करू शकते. चीनने हा अत्यंत बेजबाबदार करार असल्याचं म्हटलं आहे. हे शीतयुद्धाची मानसिकता दर्शवणारं पाऊल आहे. यापूर्वी ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियानं विशेष सुरक्षा कराराची घोषणा केली होती. ताज्या करारानुसार अमेरिका ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुडी तंत्रज्ञानही पुरवेल. आशिया पॅसिफिक क्षेत्रात चीनशी स्पर्धा करण्यासाठी हा नवीन सुरक्षा करार करण्यात आला असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. हे क्षेत्र वर्षानुवर्षं वादाचं कारण आहे आणि त्या ठिकाणी तणाव कायम आहे. ऑकस सुरक्षा करारावरील संयुक्त निवेदनात म्हटलं आहे की ‘ऑकस’अंतर्गत पहिला उपक्रम म्हणून आम्ही रॉयल ऑस्ट्रेलियन नौदलासाठी अण्वस्त्रचालित पाणबुड्या तयार करण्यास प्रतिबद्ध आहोत. यामुळे हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य कायम राखण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आमच्या सामायिक मूल्यांसाठी आणि हितसंबंधांच्या समर्थनार्थ आम्ही पाणबुड्या तैनात करु.
या पाणबुड्यांचा पुरवठा झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया जगातल्या सात अशा देशांच्या यादीत असेल, ज्यांच्याकडे अण्वस्त्रचालित पाणबुड्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत आणि रशिया या देशांकडे हे तंत्रज्ञान आहे. या पाणबुड्या पारंपारिकरित्या चालवल्या जाणार्‍या पाणबुड्यांपेक्षा वेगवान असतील आणि त्यांचा शोध घेणं अत्यंत कठीण असेल. त्या अनेक महिने पाण्यात राहू शकतात आणि क्षेपणास्त्रांद्वारे दूरपर्यंत हल्ला करू शकतात. ताजा करार महत्त्वाचा आहे कारण गेल्या 50 वर्षांमध्ये अमेरिकेने ब्रिटनव्यतिरिक्त इतर कोणालाही आपलं पाणबुडी तंत्रज्ञान दिलं नव्हतं. ‘ऑकस’ करारासंदर्भात असाही प्रश्‍न उपस्थित केला जातो की ‘क्वाड’ करार असताना अमेरिकेला या नवीन कराराची आवश्यकता का भासली? ‘क्वाड’ करारात अमेरिका, ऑस्ट्रेलियासह जपान आणि भारत आहे. ‘ऑकस’ला दोन दृष्टिकोनांमधून समजून घेणं आवश्यक आहे. क्वाडव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासोबत असा करार करणं हा ‘मिलिटरी अलायन्स’ सुरू करण्याचा एक मार्ग असू शकतो. क्वाडची रचना ही चार देशांमधल्या ‘लष्करी सहकार्या’च्या दृष्टिकोनातून करण्यात आली होती; परंतु त्यात ‘उच्च तंत्रज्ञान’ हस्तांतरणाबद्दलचा उल्लेख नाही. क्वाडमध्ये असे करार झाले असते तर भारतालाही फायदा झाला असता. त्यामुळे ‘ऑकस’ला क्वाडपासून स्वतंत्र ठेवण्यात आलं.
ऑकस करार हे लष्करी आघाडीसाठी एक व्यासपीठ आहे, ज्यात अमेरिका आणि ब्रिटन आधीच एकत्र होते आणि आता ऑस्ट्रेलिया सहभागी झाला आहे. क्वाड देशांचं लष्करी भागीदार होणं कठीण आहे. भारत आणि जपानचा संभ्रम याला कारणीभूत आहे. धोरणात्मकदृष्ट्या अमेरिकेच्या जवळ असण्याबरोबरच भारताला रशिया आणि इराणबरोबरही चांगले संबंध ठेवायचे आहेत. भारतापेक्षा जपानला अधिक संकोच आहे. जपानचे चीनशी चांगले व्यापार संबंध आहेत. जपानकडून बीआरआय प्रकल्पातही चीनला मदत मिळत आहे. त्यामुळे जपानला चीनबरोबरचे आपले सर्व संबंध अडचणीत आणायचे नाहीत. त्यामुळे क्वाडमधल्या देशांमध्ये इतर अनेक आघाड्यांवर सहकार्याची चर्चा आहे. दरम्यान, हा करार झाल्यानंतर फ्रान्सने तीव्र आक्षेप घेतला. या विषयावर विचार-विमर्श करण्यासाठी फ्रान्सने अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधल्या आपल्या राजदूतांना माघारी बोलावलं. ब्रिटन सहभागी असलेल्या सुरक्षा कराराविरोधातलं पाऊल म्हणून या घडामोडीकडे पाहिलं जातं आहे. ऑस्ट्रेलियाला अणुऊर्जेतून पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान दिल्याने फ्रान्स नाराज आहे.
या कराराकडे दक्षिण समुद्रात चीनचा वाढता दबदबा संपण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल म्हणूनही पाहिलं जातं आहे. फ्रान्सच्या नाराजीची दखल अमेरिकेला घ्यावी लागली. अमेरिकेतल्या बायडेन प्रशासनाने म्हटलं आहे की फ्रान्सशी झालेल्या चर्चेतून हे मतभेद दूर केले जातील. ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मरीस पेन यांनी म्हटलं की फ्रान्सची ‘निराशा’ आम्हाला कळते आणि आम्ही फ्रान्सला समजावून देऊ की द्विपक्षीय संबंधांना आम्ही महत्त्व देत आहोत. असं असलं तरी मित्रराष्ट्रांमधल्या राजदूतांना माघारी बोलावणं ही असामान्य गोष्ट आहे. त्यातून आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया कसा मार्ग काढणार, हे महत्त्वाचं. आता युरोपीयन संघाची नाराजी दूर करण्याचं आव्हान अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियापुढे आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात दोन्ही देशांमधले संबंध चांगले करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर आठवडाभरात ऑकस करार करण्यात आला. ऑस्ट्रेलिया आण्विक प्रसारबंदी कराराच्या बाजूने असतानाही आता अमेरिकेकडून आण्विक पाणबुड्या घेणार आहे. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाला अमेरिका किती महत्त्व देतो, हे यामधून दिसून येतं. या कराराचा परिणाम प्रामुख्याने फ्रान्स आणि चीन या दोन देशांवर होईल. 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन नौदलासाठी फ्रेंच डिझाईनच्या 12 पाणबुड्या तयार करण्याचं कंत्राट फ्रान्सला मिळालं होतं. ऑकस करारामुळे ऑस्ट्रेलियाने फ्रान्ससोबतचा हा करार रद्द केला आहे.
या कराराची रक्कम सुमारे 50 बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर इतकी होती. हा ऑस्ट्रेलियाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार मानला गेला होता. त्यामुळे नाटोमध्ये अमेरिकेचा मित्र देश असलेल्या फ्रान्ससाठी ऑकस करार हा एक धक्का आहे. ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया प्रशांत महासागर क्षेत्रात चीनचा दबदबा वाढताना पाहून किती चिंताग्रस्त आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत

Next Post

फार्महाऊसवर तरुणीचे अश्‍लिल चित्रफीत बनविणार्‍या तरुणाला अटक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
बनावट ई पासने जिल्ह्यात येणारे पोलिसांच्या ताब्यात

फार्महाऊसवर तरुणीचे अश्‍लिल चित्रफीत बनविणार्‍या तरुणाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?