• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

कोरोनोत्तर तक्रारींकडे लक्ष आहे?

Varsha Mehata by Varsha Mehata
October 28, 2021
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
कोरोनोत्तर तक्रारींकडे लक्ष आहे?
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. पंकज जैन

सार्‍या जगाला कवेत घेणार्‍या कोरोनाची धास्ती प्रत्येकाने घेतली. कोरोनावरील उपचारानंतर आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आली की प्रत्येकाचा जीव भांड्यात पडतो. आता आपण कोरोनातून बाहेर पडलो असून यापुढे कसलाही त्रास होणार नाही, असं कोरोनाग्रस्त राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं. त्यामुळे रुग्ण कोरोनोत्तर काळात नेहमीप्रमाणे निर्धास्त राहून नियमित जीवन जगू लागतो. मात्र, काही काळानंतर अनेकांना आरोग्याच्या काही तक्रारी, समस्या जाणवू लागतात. त्यावेळी आपल्याला कळून चुकतं की कोरोनातून आपण बाहेर पडलो असलो तरी या व्याधीने आपल्या काही पाऊलखुणा आपल्या शरीरात सोडल्या आहेत. वैद्यकीय भाषेत या पाऊलखुणांचं वर्णन ‘लाँग कोव्हिड’ असं केलं जातं. लाँग कोव्हिडची लक्षणं सरसकट प्रत्येकात जाणवतात असं म्हणता येत नाही. वाढत्या वयाच्या रुग्णांमध्ये आणि प्रामुख्याने महिलांमध्ये याची लक्षणं आढळतात. कोरोना होऊन गेलेल्या सुमारे 20 ते 25 टक्के रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळतात. युरोपमध्ये हे प्रमाण जास्त असून 35 टक्के रुग्णांमध्ये लाँग कोव्हिडची लक्षणं आढळतात. आता ही लक्षणं नेमकी कशामुळे आढळतात, हे अजून स्पष्ट व्हायचं आहे. त्यावर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन सुरू आहे. कोरोनापाठोपाठ आलेल्या या आरोग्य संकटाचं नेमकं स्वरूप काय आणि त्याच्यापासून आपला बचाव करायचा असेल तर काय करावं लागेल, हे जाणून घेणं आवश्यक ठरतं.
कोरोनानंतर तीन ते सहा महिन्यात लाँग कोव्हिडची लक्षणं आढळू शकतात. आयसीयूमध्ये उपचार घेतलेल्या सुमारे 50 टक्के रुग्णांना लाँग कोव्हिडचा धोका असू शकतो. लाँग कोव्हिडच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने श्‍वास घेताना त्रास, ब्रेन फॉग, हृदयविकार, चक्कर येणं, हृदयाचे ठोके वाढणं, अचानक थकवा जाणवणं, दम लागणं, झोपेची समस्या आदींचा समावेश करता येईल. लाँग कोव्हिडची लक्षणं सर्वांमध्ये आढळतात असंही नाही. रक्तदाब, हृदयविकार, डायबेटीस असे जोखमीचे आजार असणार्‍या रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळण्याची शक्यता अधिक असते. कोरोना टाळण्यासाठी आणि कोरोना उपचारकाळात काय काळजी घेतली पाहिजे, हे बहुतेक लोकांना माहिती आहे. मात्र, कोरोना होऊन गेल्यानंतर उद्भवणार्‍या आरोग्याच्या संकटाला तोंड देताना घ्यावयाची काळजी आणि उपचारांचं स्वरुप याविषयी योग्य आरोग्यविषयक जाणीव निर्माण होण्याची गरज आहे. मुळात कोरोना होऊन गेल्यावर शरीरात होणार्‍या बदलाकडे किंवा समस्यांकडे फार गांभिर्याने पाहिलं जात असल्याचं दिसत नाही. बरेच नातेवाईक या तक्रारी म्हणजे मानसिक खेळ असल्याचं समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. दहा दिवस आयसोलेशनमध्ये रहावं लागल्यानं असं वाटत आहे, असं सांगून रुग्णाची समजूत काढली जाते. मात्र, या तक्रारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तसंच सांगोपांगी सल्ले किंवा माहितीवर विसंबून स्वत: उपचार घेणं म्हणजे आपले प्राण धोक्यात घालण्यासारखं आहे. काही तक्रार जाणवत असल्यास योग्य वैद्यकीय सल्ला घेणं कधीही चांगलं. कोरोनानंतरचे शरीरातील बदल मानसिक नसून तो विकारच आहे आणि त्याकडे वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असते.
वर उल्लेख केलेल्या लक्षणांमध्ये एक उल्लेख आहे तो ब्रेन फॉगचा. आपल्याला हिवाळ्यात पहायला मिळणारा फॉग म्हणजे दाट धुकं हे माहित असतं. ब्रेन फॉग म्हणजे वैद्यकीय भाषेत नेहमीच्या गोष्टी एकाएकी विस्मरणात जाणं. हे रुग्ण अचानक नेहमीच्या गोष्टी विसरू लागतात. गाडीची चावी, पाकिट, मोबाईल अशा अनेक नेहमी हाताळल्या जाणार्‍या वस्तू आपण कुठे ठेवल्या याचं विस्मरण होतं. मेंदूमध्ये ब्लॅक आऊट होऊन नेहमीच्या गोष्टी आपण विसरत असल्याचं जाणवायला लागतं. मानसिक एकाग्रतेची जास्त गरज अपेक्षित असणार्‍या संगणक किंवा आयटी क्षेत्रात ब्रेन फॉगचा फटका जास्त तीव्रतेने जाणवत असल्याचं आढळतं. पूर्वीसारखी एकाग्रता नसल्याने कामावर परिणाम होत असल्याचं आज अनेकांना जाणवत आहे. यातल्या अनेकांवर तर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. ब्रेन फॉगमुळे वेळेत निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. या समस्येवर दोन प्रकारे उपचार करता येतात. त्यातली एक आपल्या जीवनशैलीशी आणि आपल्या खाण्याच्या शैलीशी निगडीत आहे. दुसरा पर्याय हा औषधोपचाराचा आहे. इथे वैद्यकीय तज्ज्ञ महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
कोरोना उपचारानंतर बर्‍याचजणांना आपला तोल जात असल्याचं जाणवतं. अनेकांना थोडंसं चाललं किंवा जीना चढताना-उतरताना दम लागत असल्याचं जाणवायला लागतं. अवसान गळल्यासारखं वाटतं. बर्‍याचजणांना हृदयाचे ठोके वाढत असल्याचं जाणवतं. साधारणपणे आपल्या हृदयाचे मिनिटाला 72 ठोके पडतात. मात्र, अशा रुग्णांच्या हृदयाचे ठोके 100 ते 110 पर्यंत वाढल्याचं दिसतं. काही घटनांमध्ये तर हृदयाचे ठोके 120 पर्यंत वाढलेले दिसतात. कधी कधी तर हृदय छाती फोडून शरीराबाहेर पडतं की काय असंही वाटू लागतं. अर्थात, औषधोपचाराद्वारे हे ठोके नियंत्रित करता येतात. त्याचबरोबर कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढल्याचं आढळून येत आहे. ज्यांना डायबेटीसग्रस्त रुग्णांना याचा अधिक धोका असल्याने अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनाकाळातल्या उपचारानंतर अनेक घटनांमध्ये महिना-दीड महिन्यानंतर रक्त घट्ट होऊन गुठळ्या झाल्याचं आढळलं आहे. त्यामुळे ब्लॉकेजचं प्रमाण वाढू शकतं.
युरोपमध्ये अशा प्रकारच्या घटनांचं प्रमाण अधिक आहे. या रुग्णांना उपचारावेळी रक्त पातळ करणार्‍या औषधांचा वापर करावा लागतो. हा त्रास त्या त्या रुग्णानुसार कमी अधिक प्रमाणात दीर्घकाळ जाणवू शकतो. अशा रुग्णांनी पल्मॉनॉलॉजिस्टचा सल्ला घेणं कधीही चांगलं. कोरोनोत्तर काळात डायबेटीस, कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना झाल्याने आयसीयूमध्ये उपचार घ्यावे लागलेल्यांना पल्मनरी फायब्रोसिसची समस्या जाणवू शकते. आयसीयूमध्ये उपचारावेळी स्टेरॉईर्डचा वापर अधिक झाल्यास शरीरावर त्याचेही दुष्परिणाम जाणवू लागतात. स्टेरॉईर्डच्या अतिवापरामुळे कोरोनानंतर डायबेटीस, म्युकर मायकोसिस, गॅस्ट्रॉयसिस, वेट गेन, व्होमिटिंग, नॉशिया आदी समस्यांना सामोरं जावं लागत आहे. श्‍वासात अडथळे येत असतील तर वैद्यकीय सल्ल्यानुसार काही श्‍वसनतंत्राचा अवलंब, योगासनाचे काही प्रकार उपयुक्त ठरतात. श्‍वसनतंत्रासाठी प्राणायमातल्या काही प्रकारांची मदत होऊ शकते. श्‍वासोच्छवासाच्या उपचारांमध्ये फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यावर भर दिला जातो. त्याचबरोबर गरज पडल्यास औषधांद्वारे उपचारही करावे लागतात. अर्थात ते श्‍वसन अडथळ्यातली तीव्रता आणि रुग्णाच्या उपचारांवरील प्रतिसादावर अवलंबून असतं.
कोरोना हा फुफ्फुसाशी संबंधित विकार असल्यानं अनेक तक्रारी छातीशी निगडीत आहेत. कोरोना केवळ फुफ्फुसाशी संबंधित नसून त्याचा परिणाम शरीराच्या अन्य अवयवांवरही होत असल्याचं आढळत आहे. कोरोनानंतर आपल्या शरीरात होणार्‍या बदलांकडे मनाचा खेळ म्हणून नव्हे तर आरोग्याची तक्रार म्हणून पाहण्याची गरज आहे. शरीरातल्या बदलांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याची गरज आहे. शरीरातले छोटे-मोठे बदलही महत्त्वाचे असतात. कोरोना झाल्यानंतरच्या काळातल्या बदलांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. यामुळे वेळीच वैद्यकीय किंवा छातीविकार तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं. कोरोनाने दिलेले अनुभव आणि ज्ञान हे काही काळापुरतं नाही. आपल्याला कोव्हिडसमवेत पुढील वीस-पंचवीस वर्षं काही तडजोडी कराव्या लागणार आहेत. लाँग कोव्हिडला पराभूत करण्यासाठी शरीरातल्या बदलांवर लक्षपूर्वक नजर ठेवणं, वेळीच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणं, आवश्यक औषधोपचार सुरू करणं या त्रिसुत्रीचा अवलंब करावा लागेल, हे नक्की. लसीकरणावर भर आणि गंभीर स्वरुपाचा संसर्ग होऊ न देणं याची काळजी घेतली तर लाँग कोविडची भीती राहणार नाही, हे ही दखलपात्र.

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

न्याय बाकी आहे

Next Post

पाकिस्तानचा विजय साजरा कराल तर देशद्रोही ओळखले जाल – योगी आदित्यनाथ…

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post
पाकिस्तानचा विजय साजरा कराल तर देशद्रोही ओळखले जाल – योगी आदित्यनाथ…

पाकिस्तानचा विजय साजरा कराल तर देशद्रोही ओळखले जाल - योगी आदित्यनाथ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?