। अलिबाग । वार्ताहर ।
कुरूळ येथील उंडीचे भाट सभागृहात क्षात्रैक्य समाज संस्था अलिबागची तेवीसावी वार्षिक सर्वसाधारणसभा द्वारकानाथ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
क्षात्रैक्य समाज संस्थेने आजवर राज्यस्तरीय कृषक महोत्सव, राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, शेतकरी प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थी समुपदेशन वर्ग असे विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबविलेले असून हे काम अव्याहतपणे सुरु आहेत. लग्न समारंभासह इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी प्रशस्त हॉलबाबत समाधान व्यक्त केले. यापुढील नियोजनात शैक्षणिक सहलींच्यादृष्टीने तसेच वधूवरांना राहण्यासाठी किचनशेडवर आकर्षक रुम बांधण्याच्या कामी बहुसंख्य सभासदांनी सहमती दर्शवून, आर्थिक आणि इतर सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये द्वारकानाथ नाईक, सचिव प्रदीप नाईक, उपाध्यक्ष अभिजित राणे, श्रीकांत पाटील, मनोज राऊळ, रवींद्र वर्तक, महेश कवळे, सुरेंद्र नागलेकर, श्रीनाथ कवळे, अविनाश राऊळ, रमेश नाईक, मोहन वर्तक, महेंद्र पाटील, संतोष पाटील, जगदीश कवळे, अॅड. प्रसाद म्हात्रे, अॅड. समाधान पाटील, अॅड. गौरी म्हात्रे, शालिनी नाईक, गणेश राणे, अॅड. के.डी. पाटील आणि सभासद उपस्थित होते.







