| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील क्षात्रैक्य समाज संस्थेचा तेवीसावा वर्धापन दिन सोहळा व वधू वर परिचय मेळावा स्व.नंदकुमार नाईक आणि स्व.सौ.नमिता प्रशांत नाईक सभागृहात संस्थेचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.मोहन वर्तक, स्नेहल कवळे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजित राणे, श्रीकांत पाटील यांसह विविध पदाधिकारी, मान्यवर व समाज बांधव विशेष करून महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होत्या.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक यांनी स़ंस्थेच्या कामकाजाचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.यामध्ये उद्योजक अनिल म्हात्रे यांना प्रदीप नाईक पुरस्कृत स्व.सौ.सुमती कृष्णाजी नाईक क्षात्रैक्य भूषण युवा पुरस्कार, चौल येथील पाठारे क्षत्रिय समाज अध्यक्ष रमेश म्हात्रे यांना स्व.कृष्णाजी रामचंद्र नाईक क्षात्रैक्य भूषण पुरस्कार, अलिबाग तळवली येथील प्रभाकर नाईक यांना द्वारकानाथ वामन नाईक पुरस्कृत स्व.भागिरथी वामन नाईक क्षात्रैक्य कृषिनिष्ठ पुरस्कार, पालघर -चिंचणी येथील बळवंत सावे यांना कृषिभूषण जयवंत मुकुंद चौधरी पुरस्कृत स्व.कौशल जयवंत चौधरी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.दिपक चौधरी यांचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन लाभले.द्वारकानाथ नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी ॲड.के.डी.पाटील यांनी लिहिलेल्या ग्रामपंचायत अधिनियम पुस्तकाचे प्रकाशन व संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दुपारच्या सत्रात विवाहेच्छूक वधू वर नोंदणी, परिचय मेळावा घेण्यात आला.