| उरण | वार्ताहर |
उरण पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार उघड केल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे. यापुढे लवकरच उरण पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघड होण्यासाठी गावागावातील जागृत नागरिक पुढाकार घेणार आहेत. युवा सामाजिक संस्था जसखारच्या उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे आणि सर्व महिला सदस्यांनी ग्रामस्थांना दाखवून दिले कोणतेही काम करण्यासाठी इच्छाशक्ती असणे महत्वाचे आहे. मागील आठ महिन्यापूर्वी ठराव झालेल्या गावातील विकास कामाची मंजुरी मिळण्यासाठी पैसे द्यावे लागतील तरच कामाचे इस्टीमेट मिळतील, असे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लाचलुचपत खात्याने रंगेहाथ पकडून दाखविले आहे.
सदर महिलांनी कोणतीही लाच न देता स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यांनी यशस्वी पाठपुरावा करून जवळपास 1 कोटी रकमेची विकासकामे जसखार ग्रामस्था करिता मंजूर केली. तसेच, भ्रष्ट अधिकारी यांना वठणीवर आणल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत महिला सदस्याचें समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.