| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्याततील कुंभारेशेत गावच्या पाठीमागील डोंगरावर बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोठा वणवा लागला होता. या वणव्यामुळे कुंभारशेत गावच्या मागील डोंगराचाकाही भाग होरपळला. मात्र, नागोठणे वन विभागाला वणव्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. नागोठणे वनक्षेत्रपाल दादासाहेब कुकडे यांच्या आदेशाने वनरक्षक के.के. मुंढे, वनपाल अरुण धुमाळ, वनमजूर तांबड्या पवार आदी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांरी व कुंभारशेत ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून हा वणवा विझवला. वन विभागाने दाखवलेल्या या तत्परतेने जंगलाचे मोठे नुकसान टळले आहे. जर हा वणवा मानवी वस्तीत पोहोचला असता, तर अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. मात्र, वन विभाग्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेमुळे हे संकट टळल्याने येथील ग्रामस्थांनी वन विभागाचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले आहेत.