| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे, द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे कुंभेट या ठिकाणी स्वच्छ भारत- निरोगी भारत विशेष हिवाळी निवासी शिबीर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन डॉ. श्रीनिवास वेदक अध्यक्ष महाविद्यालय विकास समिती यांच्या हस्ते पार पडले. या कालावधीत कुंभेट या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. यात ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, आरोग्य तपासणी, कृषी मार्गदर्शन, सुविचार लेखन, ग्राम सर्वेक्षण, पानवटा विहीर स्वच्छता व रंगकाम, पाणीपुरवठा टाकी परिसर स्वच्छता व रंगकाम, विविध विषयावर बौद्धिक व्याख्याने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कार्यक्रम अधिकारी डॉ. दिवाकर कदम यांनी केले. कार्यक्रमास तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, मंगेश देशमुख तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. दत्ता कुंटेवाड तर आभार प्रदर्शन डॉ. राजाराम थोरात यांनी केले.