कुंभिवली ऑईल कारखान्याला आग

मालासह वाहन जळून खाक
परिसरात धुराचे लोट, नागरिकांमध्ये घबराट

| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात कुंभिवली ग्रामपंचयत हद्दीत अनाधिकृतपणे टायरपासून ऑइल बनविणारी कंपनी कार्यरत असून, या कंपनीची उत्पादन प्रक्रिया रात्रीच्या दरम्यान सुरू ठेवली जाते. मात्र, या ठिकाणी बाजूला माळरान असल्याने उन्हाच्या तडाख्यात आग लागल्याने टायर बनविण्यासाठी असणार्‍या केमिकलने पेट घेतल्याने सर्वत्र आगीचे लोट पसरले. आग विझविण्यासाठी परिसरातील कारखान्यांच्या अग्निशमक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. या आगीत कारखान्यात असणार्‍या मालाचे मोठे नुकसान झाले.

दैव बलत्तर म्हणून बाजूच्या ज्वलनशील कारखान्यांना या आगीची झळ बसली नाही. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील धनिक प्रशांत या मालकाने विजय प्रीत इंडस्ट्रील या नावाने कारखाना उभारला असून, याठिकाणी टायरची पावडर बनवून केमिकल्स मिश्रण करून ऑइल बनविण्यात येते.दरम्यान, परिसरात मोठे प्रदूषण होत असल्याने रात्रीच्या वेळी ही कंपनी कार्यरत असते, अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. या कंपनीच्या बाजूला रानमाळ असल्याने या ठिकाणी 7 एप्रिलला दुपारी उन्हाच्या कडाक्यात वातावरण तापले असताना आग ही लागली. ही आग या कारखान्यात गेली आणि येथील केमिकल आणि कच्चा माल टायरची पावडर ही आग पकडली.

त्यानंतर आगीचा भडका वाढतच गेला. त्यामळे अग्निशामक दल खोपोलीसह परिसरातील कारखान्यामधील अग्निशमक दलाच्या वाहनांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीची गंभीरता लक्षात घेत तहसीलदार आयुब तांबोळी पोलीस निरीक्षक बाळा कुंभार माजी सरपंच ज्ञानेश्‍वर गायकवाड आदी लोकप्रतिनिधी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version