माणगाव | सलीम शेख |
माणगाव तालुक्यातील लोणेरे गावचे कुणबी समाजाचे बत्तिशी विभाग अध्यक्ष तथा न्यायदान कमिटीचे माणगाव तालुका अध्यक्ष व मंडळाचे खजिनदार रामभाऊ टेंबे यांची वृध्द कलावंत मानधन कमिटीवर रायगड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती व पुणे येथील कार्य संचालक यांचे सदस्यपदी निवड करण्यात आला.त्यनिमित्ताने त्यांचा कुणबी भवन येथे माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळामार्फत महादेवराव बक्कम यांच्या अध्यक्षतेखाली व शैलेश भोनकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
शाहीर जंगम बुवा मंडणगड, दीपक भोस्तेकर मुर, केशव घुळघुळे आमडोशी, काशिराम वाढवळ कालवण व संतोष भात्रे मुर या शाहिरांनी रामभाऊ टेंबे यांचे जीवनावर गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर कार्यक्रमाला टिकम भोनकर , भोरावकर गुरुजी,काका नवगणे,टेंबे गुरुजी,भागोजी बुवा डवळे , बाळ खरंगटे,मुकुंद जांभरे,शिर्के भाऊसाहेब,वाढवळ गुरुजी,काशिराम पाखुर्डे,संदीप खरंगटे,नामदेव खराडे,काशिराम पोवार,महादेव खडतर,काशिराम लहाने,रवींद्र अर्बन आदी मान्यवर उपस्थित होते.







