ठाणे येथे कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद

| मुंबई | प्रतिनिधी |

कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीने शनिवारी (दि.25) गडकरी रंगायतन, ठाणे येथे सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, अतुल सावे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, अशोक वालम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कुणबी समाजातील उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणणारी ही पहिलीच व्यावसायिक परिषद असून याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे आणि सचिव जय पाटील यांनी केले आहे.

समाजाला उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करणे आणि त्यातूनच सामजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पारंपरिक शेती, आधुनिक शेती, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रात समाज क्रांती घडविण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेत समाजातील दिग्गज, लहान मोठे व्यवसायिक / उद्योजक तसेच नव व्यवसायिक मोठ्या संख्येने सभासद झालेले असून त्यांना व्यवसायिक मार्गदर्शन मिळावे यासाठीच कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद 2023 चे आयोजन करण्यात आल्याचे श्री. अशोक वालम यांनी सांगितले.

Exit mobile version