जय हनुमान संघ उपसरपंच चषकाचा मानकरी
| उरण | वार्ताहर |
दिघोडे हायस्कूलच्या मागील मैदानावर एस.एन. स्पोर्ट्सच्यावतीने दि. 23 व 24 डिसेंबर रोजी विश्वजित ठाकूर व अभिजित ठाकूर यांच्या पुढाकारातून सरपंच व उपसरपंच चषक- 2023 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कायरा इलेव्हन संघ भिंगारी सरपंच चषकाचा मानकरी ठरला. तर, जय हनुमान खारकोप संघाने उपसरपंच चषक पटकावला.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी सरपंच अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच कीर्तिनीधी ठाकूर, उपसरपंच अभिजित पाटील, सदस्य कैलास म्हात्रे, उज्वला पाटील, कैलास पाटील, अलंकार कोळी, अपेक्षा पाटील, अपेक्षा कासकर, आरती कोळी, रेखा कोळी, उद्योजक सचिन घरत, कैलास पाटील, अनंत पाटील, रमेश कोळी, डॉ. राजेश घरत, एकनाथ घरत, विकास माळी, संदीप माळी, सत्यवान कोळी, अलंकार ठाकूर, राजन पाटील, शंकर कासुकर, शेकाप अध्यक्ष हितेश ठाकूर, वरुण पाटील, गजानन पाटील, अतिष पाटील, नरहरी कोळी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेचे समालोचक म्हणून निशिकांत घरत, रोशन पाटील, सागर पाटील यांनी काम पाहिले. पंच म्हणून दीपक पाटील (विंधणे), संदीप पाटील (जासई) यांनी काम पाहिले, तर गुणलेखक म्हणून अभय ठाकूर व मंदार पाटील यांनी काम केले. या स्पर्धेमध्ये कायरा इलेव्हन संघाचा कुणाल नाईक मालिकावीराचा, तर उत्कृष्ट फलंदाज शेखर पाटील (खारकोपर), उत्कृष्ट गोलंदाज आशिष (भिंगारी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्षल घरत (खारकोपर) मानकरी ठरला.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी अनिकेत भगत, शक्ती कोळी, शेकाप अध्यक्ष हितेश ठाकूर, उपाध्यक्ष विनोद माळी, विलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य विंधणे सूरज म्हात्रे, माजी उपसरपंच विंधणे शक्ती म्हात्रे, दर्शन पाटील, समाधान पाटील, उलवे नोड प्रदीप म्हात्रे आदींसह एस.एन. स्पोर्ट्स खेळाडू, 40 प्लस खेळाडूंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.