बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली मजुरांचा मृत्यू

| मुंबई | प्रतिनिधी |

भायखळा येथील हबीब मॅन्शन, हंस रोड, भायखळा (पश्चिम) या ठिकाणी सुरू असलेल्या एका इमारतीच्या पायाभरणी आणि ढिगाऱ्याच्या कामादरम्यान माती आणि चिखलाचा काही भाग कामगारांवर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 5 कामगार मातीखाली दबले गेले होते. त्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, नायर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील 2 जणांना मृत घोषित करण्यात आले आहे, तर उर्वरित 3 कामगार जखमी असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे भायखळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Exit mobile version