| उरण | प्रतिनिधी |
उरणचा औद्योगिक विकास वेगाने वाढत असताना स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे मात्र गंभीरपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. ओएनजीसी, एनएडी, जेएनपीटी, बीपीसीएल, डीपी वर्ल्ड, सिंगापूर पोर्ट, वीज प्रकल्प अशा देशपातळीवरील महत्वाच्या उद्योग आणि प्रकल्प उरणमध्ये कार्यरत असतानाही या तालुक्यात एकही सुसज्ज, अत्याधुनिक रुग्णालय उपलब्ध नाही. औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये भाजण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असतात, परंतु उरणमध्ये बर्न सेंटरसारखी अत्यावश्यक सुविधा नसल्याने गंभीर जखमींना वाशी किंवा मुंबईकडे हलवावे लागते. त्यामुळे उपचारातील उशिरामुळे जीवितहानीची शक्यता वाढते. तसेच, एकेकाळी ‘भाताचे कोठार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरणमध्ये आज सिडकोने मोठ्या प्रमाणावर जमिनी संपादित केल्या. शेतकऱ्यांनी विकासाच्या आशेवर जमीन दिली; परंतु, विकासाच्या केंद्रस्थानी असलेल्या उरणकरांना हवी ती मूलभूत नागरी सुविधा आजतागायत मळािलेली नाही. औद्योगिक आणि निवासी क्षेत्र प्रचंड प्रमाणात वाढले असतानाही उरणमध्ये मुलांना खेळण्यासाठी एकही सुसज्ज मैदान उपलब्ध नाही. स्थानिक खेळाडूंना सराव आणि स्पर्धांसाठी उरणच्या बाहेर जावे लागते, हा उरणच्या क्रीडा संस्कृतीला बसलेला मोठा धक्का आहे.
उरणकरांच्या मूलभूत गरजांची वानवा

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606