कोर्लई किल्ल्यात सुविधांचा अभाव

पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

पोर्तुगिज कालीन कोर्लई किल्ला पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. मुरूड पर्यटनात पर्यटक कोर्लई पहाण्यासाठी हमखास भेट देत असतात. परंतू, पर्यटकांना खुणावणार्‍या कोर्लई किल्ल्यात सुविधांच्या अभाव असल्याचे निदर्शनास येत असून त्याकडे पुरातत्व खात्याचे पुर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे पर्यटक तसेच स्थानिकांकडून बोलले जात आहे.

मुरूड तालुका पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरले असून मिनि गोवा म्हणून संबोधले जाते. त्यातच साळाव या मुरूडच्या प्रवेशद्वारानजीक दोन किमी अंतरावर असलेला पोतुगिजकालीन कोर्लई किल्ला सुध्दा पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. परंतु, कोर्लई किल्लात जाण्यासाठी मार्गफलक फलकांचा अभाव असल्याने किल्ल्यात जाण्याकडचा रस्ता शोधवा लागतो. गाईड उपलब्ध नसल्याने किल्ल्यात कोठून प्रवेश करावा, असा प्रश्‍न देखील पर्यटकांना निर्माण होतो. तसेच, किल्लात जाण्यासाठी एक-दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक मार्गाने पायर्‍यांचा मार्ग सुध्दा नादुस्त असल्याने अवघड बनला आहे, तर दुसर्‍या बाजूकडून जाताना झाडीझूडूपातून रस्ता शोधत जावे लागत आहे. त्याचप्रमाणे किल्ल्याच्या आवारात देखील रानटी झाडीझुडपी त्रासदायक ठरत आहेत. किल्लावर साफसफाई करीता एकच कर्मचारीवर्ग असल्याने तेथे घाणीचे साम्राज्य वाढले असून पाण्याची कमतरता देखील जाणवत आहे. तसेच, किल्लावर पर्यटकांसाठी मुलभूत सुविधांची उपलब्धता नसल्याने येथे येणारा पर्यटक निरूत्साही होत आहे. असे असताना देखील आणि यावर स्थानिकांकडून वेळोवळी आवाज उठवूनही पुरातत्व खाते दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version