भात कापणीला मजुरांचा अभाव

| आगरदांडा | प्रतिनिधी |

परतीच्या पावसात काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने बळीराजावर संकट कोसळले असले तरी बळीराजा भात कापणी करण्यात व्यस्त आहेत. मात्र भात कापणासाठी शेतमजुरांच्या कमतरतेमुळे शेतीची कामे खोळंबली असुन मजुरांची मनधरणी करुन भात कापणी करावी लागत आहे. वाढती मजुरी व मजुरांची कमतरता भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य कापणी, झोडणी, मळणी व बांधणीच्या कामाला लागली आहेत. यामध्ये सुशिक्षित तरुण देखील प्रकर्षाने आहेत. शिवाय यावेळी अनेक गंमतीजमती, गाणी, जेवण आदी देखील होते.

नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी आली आहेत. सुशिक्षित तरुणांना शेतीत रस निर्माण झाला असून शेतकामात आता शिकला सवरलेला वर्ग दिसून येत असल्याने कृषी क्षेत्रात हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने आटपून घेत आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्रीपरतीच्या पावसात काही ठिकाणी पिकांची नासाडी झाल्याने बळीराजावर संकट कोसळले असले तरी बळीराजा भात कापणी करण्यात व्यस्त आहेत. चा वापर करीत आहेत. यामध्ये श्रम वेळ व पैसा बचत होत आहे.

Exit mobile version