‌‘लाडकी बहीण’ वादाच्या भोवऱ्यात

वर्षाला 47 हजार कोटींचा राज्यावर अतिरिक्त बोजा

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या योजनेपोटी दरवर्षी 46 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळं राज्याच्या वित्त विभागानं या योजनेच्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे.

राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता या योजनेवर होणाऱ्या खर्चाबद्दल वित्त विभागानं चिंता व्यक्त केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेवर चर्चा होण्यापूर्वी राज्याच्या वित्त विभागानं महिला व बालकल्याण विभागाच्या वर्षभराच्या कार्यक्रमांसाठी आधीच 4,677 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. पण तरीही ‌‘लाडकी बहीण’ योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचे बोलले जात आहे. आता या योजनेची अंमलबजावणी करताना राज्याची आर्थिकस्थिती पाहता, आवश्यक निधीची व्यवस्था कशी करायची? याची चिंता वित्त विभागाला भेडसावत आहे. आत्तापर्यंत 40 लाखांहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.

Exit mobile version