खोपोलीत लाखोंचा ऐवज चोरीला

| खोपोली | वार्ताहार |

खोपोली पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी (दि.20) संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास मांउटन व्हयुव इमारतीमधील तिसऱ्या मजळयावर अज्ञात चोरटयांनी घरफोडी केली आहे. घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत बंद दरवाज्याचा कडीकोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडुन त्यावाटे आत जात घराच्या बेडरुम मधील कपाटा मध्ये ठेवलेले एकूण 6 लाख 63 हजार 551 रुपये किंमतीचे सेान्याचे दागिने व रोक रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयाने लंपास केले. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई सुधाकर लहाने करीत आहेत.

Exit mobile version