| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी येथील पिल्लई एचओसी कॉलेजात इयत्ता आकरावीत कॉमर्समध्ये शिक्षण घेत असलेली सावळे गावची लक्ष्मी प्रशांत माळी हिची नुकतीच व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 49 व्या जुनियर राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा राजस्थान येथे होत असून, पिल्लई कॉलेजतर्फे रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्याच्या संघात व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी खेळण्याचा मान लक्ष्मी प्रशांत माळी हिला मिळाला आहे. त्याबद्दल तिचे कौतुक होत असून तिला पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी लक्ष्मीची निवड
