अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर लाल बावटा

18 पैकी 11 सदस्य बिनविरोध
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवरील शेतकरी कामगार पक्षाचा वर्चस्व कायम राहिले असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 18 जागांसाठी यावेळीही शेकापच्या सर्वच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सात जागांसाठी सात अर्ज विरोधी पक्षाकडून भरण्यात आले आहेत. त्यामुळे 11 जागांवर शेकापक्षाचे सदस्य बिनविरोध निवडून आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचा लाल बावटा कायम राहिला आहे.

सोमवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सहकारी संस्था एकूण 11 जागांसाठी शेकापचे 11 तर विरोधकांचे दोन अर्ज, महिला 2 जागांसाठी शेकापचे दोन तर विरोधकांकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही. त्याचप्रमाणे इतर मागासवर्ग 1, विमुक्त जाती जमाती (भटक्या)1 हमाल 1 जागांवर प्रत्येकी एकच अर्ज दाखल करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या 4 जागांसाठी शेकाप आणि विरोधकांकडून चार-चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर व्यापारी मतदारसंघातून दोन जागांसाठी शेकापचे दोन तर विरोधकांनी एका जागेवर अर्ज दाखल केला आहे.

उमेदवारी अर्जाची छाननी 5 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक कार्यालयात होईल. 6 एप्रिल रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. तसेच 11 ते 3 च्या दरम्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. अंतिम यादी प्रसिध्दी 21 एप्रिल 2023 रोजी करण्यात येईल. निशाणीचे वाटप देखील त्याच दिवशी करण्यात येईल. मतदान 30 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यत. मतमोजणी त्याच दिवशी संध्याकाळी करण्यात येणार आहे.

Exit mobile version