शेकापच्या कार्यकर्त्यांची सरपंचपदी निवड
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
सांगोला तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड प्रक्रिया 3 जुलै रोजी पार पडली. या सातही ठिकाणी शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले, शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच निवडीवरून अनेक प्रकारच्या अफवांना उत आल होतं. काहींना वेगळाच चमत्कार होईल अशी अपेक्षा होती. मात्र सातच्या सात ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखल्याने विरोधकांचा मोठा भ्रमनिरास झाला.
निजामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमल नानासो कोळेकर, खिलारवाडीच्या शांताबाई शरद हिप्परकर, हणमंतगावच्या दिपाली तात्यासाहेब खांडेकर, तरंगेवाडीच्या जयश्री शरद खताळ, आगलावेवाडीच्या शांता हरीचंद्र हाके, बुरंगेवाडीच्या राजाक्का आर्जुन बुरंगे, तर भोपसेवाडीच्या सरपंचपदी सखुबाई सुनील नरळे या विराजमान झाल्या. सर्व नवनिर्वाचित सरपंचांचे शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांनी अभिनंदन केले असून, उज्ज्वल भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.