वरवणे ग्रा.पं.वर फडकला लालबावटा

शेकापच्या श्‍वेता पाटील सरपंचपदी बिनविरोध
। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील पूर्व विभागातील वरवणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बुधवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी पार पडली. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व भागातील वरवणे ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा फडकला असून, श्‍वेता पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अनेक वर्षांची बिनविरोध निवडणूक परंपरा कायम राखत सरपंचपदासाठी श्‍वेता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी प्रकाश मोकल यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. नवनिर्वाचित सरपंचपदी श्‍वेता पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने माजी आमदार धैर्यशील पाटील आणि अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड. निलिमा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version