समृद्ध भविष्यासाठी जमिनीतील गुंतवणूक ठरेल फायदेशीर

अलिबाग । वार्ताहर ।
गुंतवणुकीचे प्रकार आज खूप आहेत, पण सुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी जमिनीत केलेली गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरते. सरकारच्या भरपूर योजना येत्या 2-3 वर्षात पूर्ण होणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ, शिवडी-न्हावेशवा सीलिंक, अलिबाग-विरार कॉरिडॉर, कोस्टल रोड, लोकल-मेट्रो कनेक्टिव्हिटी, कोस्टल रोड, वॉटर-टॅक्सी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. म्हणूनच येथील जागांचे भाव येत्या 2-3 वर्षात गगनाला भिडणार आहेत.

इन्फ्रा टेक ही कंपनी मागील 15 वर्षांपासून या भागांमध्ये कार्यरत असून, हजारो ग्राहकांचे व्यवहार त्यांनी पूर्ण केले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त मागणी ही जमिनीसाठीच (प्लॉट) आहे. या भागांमधील जमीन ही यु 2 (यू2) झोनमध्ये येत असल्यामुळे गुंतवणुकीसाठी सर्वात जास्त फायदेशीर आहे. आपण या भागांमध्ये अगदी दोन लाखांपासून ते करोडांपर्यंत गुंतवणूक करू शकता. कारण इथे होणार विकास हा निश्‍चितच आहे, तसेच कंपनीमार्फत विविध सुविधा गुंतवणुकीसाठी दिल्या जात आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने लोन आणि पाच वर्षात रक्कम दुप्पट ह्या योजनांचा समावेश आहे. जमीन विकत घेणे ही नक्कीच चांगली गुंतवणूक आहे. जमिनीची किंमत कधीच कमी होत नाही, तिचे मूल्य वाढतच जाते, फक्त त्यासाठी काही वर्षे संयम ठेवावा लागतो. जमीन खरेदी करण्यासाठी संयम आणि हुशारीची आवश्यकता असते, म्हणूनच आजच जमिनीमध्ये गुंतवणूक करा आणि भविष्य सुरक्षित करा.

Exit mobile version