ई.टी.एस.मशीनमुळे जमीन मोजणी होणार जलद

पालकमंत्री आदिती तटकरेंनी यांचा विश्‍वास
। अलिबाग । वार्ताहर ।
जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनी मोजण्याची पद्धत खूप वेळखाऊ होती. परंतु आता ई.टी.एस. मशीन प्रत्येक तालुक्यात उपलब्ध होत असल्यामुळे प्रत्येक तालुक्यातील जमीन मोजणीचे काम आता जलद गतीने होणार असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव येथील प्रशासकीय भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात दिली.

माणगाव येथे प्रशासकीय भवनातील सभागृहात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते तसेच महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्याधुनिक जमीन मोजणी यंत्र ई.टी.एस.मशीन वितरण सोहळा संपन्न झाला.

यावेळी जिल्हा भूमीलेख अधीक्षक चारुशीला चव्हाण, प्रांताधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, तहसिलदार प्रियंका आयरे-कांबळे, पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर, सुभाष केकाणे, माजी सभापती संगिता बक्कम, माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदिप खरंगटे, नगरसेवक जयंत बोडेरे, श्रीमती श्रद्धा यादव, महसूल तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील 9 तालुक्यातील अलिबाग प्रदीप जगताप, पेण सुधीर जाधव, पनवेल विजय भालेराव, उरण गणेश राठोड, कर्जत इंद्रसेन लांडे, सुधागड काशिनाथ मोरे, माणगाव नरेंद्र आंबरे, मुरुड योगेश कातडे, पोलादपूर पंढरीनाथ चौधरी या भूमी अभिलेख उपअधीक्षक अधिकार्‍यांकडे हे ई.टी.एस मशीन सुपूर्द करण्यात आले.

Exit mobile version