खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली असल्याची घटना बुधवारी (दि. १९) घडली. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे.
दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. यामध्ये आदिवासी ठाकूर समाजाची घरे असल्याचे बोलले जात आहे. दरड कोसळलेल्या ठिकाणी ३० हून अधिक कुटूंबे अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ६० घरांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.




