मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक धिम्यागतीने
। खोपोली । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी अमृतांजन पुलाजवळ दरड कोसळली. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक मंदावली.
रायगड जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अमृतांजन पुलाजवळील डोंगराचा काही भाग एक्सप्रेसवेवर कोसळला. यात दगड, माती आणि झाडांचा समावेश आहे. सुदैवाने ही दरड कोणत्याही वाहनावर पडली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक मंदावली आहे. या घटेनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस आणि आयआरबी यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत दरड हटविण्याचे काम सुरु केले.






