बनावट नोटांचे लांजा कनेक्शन

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी रत्नागिरी येथे एकाला अटक करण्यात आल्यानंतर या बनावट नोटांची पाळेमुळे लांजा येथे असल्याची चर्चा सुरू आहे. या दृष्टीने पोलिसांना तपास करण्याची मागणी केली जात आहे.

बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी रत्नागिरी येथील प्रसाद राणे याला अटक करण्यात आली होती. या बनावट नोटांचे कनेक्शन लांजा येथुन असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कारण काहीच दिवसांपूर्वी लांजा येथील एका व्यापार्‍याला 500 रुपयांच्या 51 नोटा म्हणजे 25 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा सारस्वत बँकेच्या कॅश डिपॉझिट मशिनमध्ये भरून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हणजेच पाचशे रुपयांच्या बनावट नोटा लांजा येथे चलनात असल्याचे त्यावरून सिद्ध झाले होते. तसेच, 500 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट आहे किंवा त्या छुप्या पद्धतीने वापरात आहेत, हे त्या घटनेवरून सिद्ध झाले होते.

यातच आता रत्नागिरी येथे प्रसाद राणे या व्यक्तीला बनावट नोटांच्या छपाई प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर लांजात देखील अशा बनवट नोटांची पाळेमुळे असल्याची चर्चा सुरू आहे.

Exit mobile version