कोपरा खाडीत सक्षण पंपाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेती उपसा

रेती उपशामुळे रेल्वे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता

| पनवेल | प्रतिनिधी ।

तालुक्यातील कोपरा खाडीत मोठ्या प्रमाणात रेती उपसा करण्यात येत आहे.

एकाच वेळी सहा ते सात सक्षण पंपाद्वारे करण्यात येत असलेल्या रेती उपशामुळे, वाहतुकीसाठी आधीच धोकादायक झालेल्या शिव – पनवेल महामार्गवरील कोपरा पूल, तसेच हार्बर रेल्वे मार्गांवरील कोपरा रेल्वे पुलाला धोका पोहचण्याची शक्यता असताना स्थानिक तहसील विभाग आणि पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.

Exit mobile version