| कोर्लई | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या सर्व सोयींनी सुसज्ज अशा आयुष हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रथमच किडनी स्टोनवर यशस्वी लेझर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना सेवेत आशेचा किरण दिसला आहे.
नांदगाव येथे नुकतेच शंभर खाटांचे मल्टिस्पेशिलिटी रुग्णालय सुरु करण्यात आले असून, रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह स्त्रियांचे आजार, नेत्रविकार, लहान मुलांचे व हाडांचे आजारावर उपचार केले जातात, तसेच याठिकाणी नाक, कान, घसा, दंत, फिजिओथेरपी, नवजात बालक अतिदक्षता विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ असून, अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, सुसज्ज अपघात आणि अतिदक्षता विभाग तालुक्यासह रायगडवासियांसाठी वरदान ठरणार आहे.
या हॉस्पिटलमध्ये प्रथमच किडनी स्टोनवर भूलतज्ज्ञ डॉ. सोव्हिल, लेप्रोस्कोपिक युरोसर्जन डॉ. सौरभ, असिस्टंट सर्जन डॉ. ऋतुज माळी, लेसर तज्ज्ञ डॉ. राजेश यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. अधिक माहितीसाठी संदीप पाटील 9975530456 यांच्याशी संपर्क साधावा व आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामलिंग माळी, वैद्यकीय संचालक डॉ. अनिल गोसावी, संचालक डॉ. ऋतुज माळी, डॉ. नूतन माळी, डॉ. स्नेहा माळी-फासे, डॉ. अभिजीत फासे यांनी केले आहे.





