। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यातील ङ्गअफ वर्गातील एकूण 390 पदांसाठी राज्यसेवा परीक्षा 2022 चे आयोजन करण्यात आले असून या परीक्षेतील पहिला टप्पा म्हणजे पूर्व परीक्षेचे आयोजन दि. 2 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यात येत असून आज म्हणजे रविवार, दि. 31 ऑक्टो. रोजीची अंतिम तारीख आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी विहीत मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.