। अलिबाग । वार्ताहर ।
कृषीवलचे प्रतिनिधी तथा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा स्व. द. ग. तटकरे स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 15 मे रोजी विरार येथे होणार आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भारत रांजणकर गेली 20 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी अनेक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. याशिवाय विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा उत्स्फुर्त सहभाग असतो. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे आजवर अनेक पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. भारत रांजणकर यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा स्व. द. ग. तटकरे स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहिर झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.