रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.प्रभाकर (भाऊ) पाटील यांना शिवतीर्थावर अभिवादन

| अलिबाग |विशेष प्रतिनिधी |
रायगडचे भाग्यविधाते रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.प्रभाकर (भाऊ) पाटील यांची तेच शिल्पकार असणाऱ्या जिल्हा परिषदेची प्रशासकिय इमारत शिवतीर्थ अलिबाग येथे आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा गटनेते ॲड आस्वाद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, शिक्षणाधिकारी माध्य, जोत्सना शिंदे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, रायगड जिल्हा परिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, संजीव मोरे तसेच रायगड जिल्हा परिषद कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.

Exit mobile version