सागरगडावरील दरीतील तोफ काढण्यास शुभारंभ

। पोयनाड । वार्ताहर ।
अलिबागपासुन दहा किमी अंतरावर सागरगड किल्ला आहे. इतिहासाची साक्ष सांगणार्‍या तोफा सागरगड किल्ल्यावर होत्या. त्यातील काही तोफा किल्यावर फिरायला येणार्‍या पर्यटकांनी खोल दरित ढकलल्या आहेत. त्यातीलच एक तोफ 250 फुट दरित पडली आहे. राज्याभिषेक सोहळयाचे औचित्य साधुन ती तोफ किल्ल्यावर आणण्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आहे.
सागरगड किल्ल्यावर गायमुख ओळखले जाणारे पाण्याचे ठिकाण आहे. गायमुखाच्या पश्‍चिमेकडे खोल दरी आहे. दरित गडावरिल तोफ असल्याचे शिवप्रमी तरूणांच्या लक्षात आले. 300 किलो वजनाची ती तोफ दरीतून वर काढण्याचे ठरले. मग यासाठी कुलाबा क्रिडा प्रबोधिनी, सागरगड दुर्गरक्षक, सागरगड संर्वधन समिती या संस्था पुढे आल्या. त्यांना स्वंच्छदी फिरस्ते, सह्याद्री गृ्रप मुंबई यांचा ट्रेकरचे मोलाचे सहकार्य मिळाले.
तोफवर काढण्याचे काम अत्यंत जोखमीचे होते. कारण ज्या ठिकाणावरून तोफवर काढायची होती तेथे काथळ आहे. झाडाचा आधार पुलीचा वापर करून 190 फुटा पर्यंत वर काढण्यात यश आले आहे. अद्याप 60 फुटाचे अंतर शिल्लक आहे. अंधार पडल्यामुळे तोफ झाडाला बांधुन ठेवण्यात आली आहे. पुन्हा मोहिम राबवुन तोफ काढण्याचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.

Exit mobile version