आयुष्यमान भारत योजेनचा प्रारंभ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयुष्यमान भारत डिजिटल मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ झाला. आयुष्यमान भारत डिजिटल मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला युनिक डिजिटल आरोग्य ओळखपत्र दिले जाणार आहे. या ओळखपत्रात संबंधित व्यक्तीची आरोग्यविषयक सर्व माहिती समाविष्ट असेल. 15 ऑगस्टला लालकिल्लयावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी या मोहिमेची घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना राबविली जात आहे.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविली जाणार आहे. देशाच्या आरोग्य व्यवस्थेत आमुलाग्र बदल होत असून गेल्या सात वर्षात करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांमुळे आजचा टप्पा गाठला आला आहे. डिजिटल क्षेत्रात देशाने केलेली कामगिरी चमकदार आहे. सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात ही योजना अंमलात आणली जाईल.त्यानंतर देशभरात तिची अंमलबजावणी होईल. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेला तीन वर्षे पूर्ण होत असताना आयुष्यमान भारत डिजिटल मोहिम सुरु होत आहे, हाही एक योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या देशातील 130 कोटी लोकांकडे आधारकार्ड असून 118 कोटी मोबाईल वापरकर्ते, 80 कोटी इंटरनेट वापरकर्ते आणि 43 लोकांची जनधन बँक खाती आहेत. अशी आकडेवारी जगातील कोणत्याही देशाकडे नाही,
नरेंद्र मोदी,पंतप्रधान

Exit mobile version