पनवेलमध्ये स्मार्ट सोसायटी स्पर्धेला प्रारंभ

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस यांच्यावतीने पनवेल विधानसभा मतदार संघ कक्षेतील सोसायट्यांकरता स्मार्ट सोसायटी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत 2 मार्च पासून 31 मार्च ही स्पर्धेत सहभागी होण्याची अंतीम तारीख असणार आहे. विविध सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांना स्पर्धा समजून सांगायचे व त्यांना सहभागी करून घेण्याची जबाबदारी सोसायटी किंगडम या संस्थेला देण्यात आलेली आहे. या एक महिन्याच्या कालावधीत सोसायटी किंगडमचे प्रतिनिधी प्रत्येक संस्थेत जाऊन या स्पर्धेत सहभागी होण्याबद्दल पत्रकाद्वारे जागृती करतील, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ठरविलेल्या निकषांबद्दल संस्थेच्या पदाधिकार्‍यांना अवगत करून देतील. यावेळी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर.सी.घरत, कमांडर कलावत, मल्लिनाथ गायकवाड, अरविंद सावळेकर, निर्मला म्हात्रे, हेमराज म्हात्रे, मोहन गायकवाड, अ‍ॅड.अरुण कुंभार, राकेश चव्हाण उपस्थित होते.

Exit mobile version