नवी मुंबई पोलिसांतर्फे लोकार्पण

आपत्कालीन मदतीसाठी हॅलो पोलीस डायल 112
| पनवेल | वार्ताहर |
नवी मुंबई पोलीस दलातर्फे सिडको एक्झीबीशन हॉल, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी डायल 112 प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये नागरीकांना आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक डायल 112 वर व्हाईस कॉल, एसओएस, एसएमएस, ई मेल, वेब विनंती आणि पॅनीक बटणाद्वारे मदतीची विनंती केल्यास तात्काळ विनाविलंब महाराष्ट्र पोलीसांकडुन वर्षामध्ये 365 दिवस 24 तास पुरविण्यात येणा़र्‍या डायल 112 या प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद सेवेची मुख उद्दीष्टे ध्येय व वैशिष्टे तसेच संपूर्ण प्रक्रियेची कार्यपद्धती माहिती देवून जनजागृती करण्यात आली.

सदर कार्यक्रमास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) महेश घुर्ये, पोलीस उप आयुक्त विशेष शाखा प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 पंकज डहाणे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ विवेक पानसरे, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय संजय कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा तिरूपती काकडे व डॉ.क्टर प्रिती टिपरे, यांच्यासह महापे व नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहा. पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

चौकट
सर्व स्तरावर जनजागृती
कार्यक्रमामध्ये नवी मुंबईतील विविध 300 विद्यार्थी, 350 सुजाण नागरीक असे 650 नवी मुंबईकरांनी सहभाग घेतला होता. नवी मुंबईतील नागरीकांमध्ये डायल 112 या नंबर विषयी प्रसार व जनजागृती व्हावी याकरीता 5 सुसज्ज वाहने त्यावर डायल 112 पोस्टर्स लावून सतत 3 दिवस नमूद वाहने नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध भागामध्ये मुख्यत्वे करून ज्या ठिकाणी गर्दी होते अशा ठिकाणी गस्त करून प्रसार व जनजागृती करणार आहेत. तसेच मुख्यत्वे ठिकाणी 41,500 पोस्टर्स लावून देखील लोकांमध्ये डायल 112 या नंबरविषयी प्रसार व जनजागृती करण्यात येईल.

सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कायदा व सुव्यवस्था अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांचे हस्ते झेंडा फडकावत डायल 112 वाहनांना नवी मधील नागरीकांमध्ये जनजागृती करीता पाठविण्यात आले. त्यावेळी सभागृहात दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. सर्व नागरीकांनी आवश्यकता भासल्यास त्यांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मदत हवी असल्यास डायल 112 वर कॉल करावा,असे आवाहन नवी मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version