| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथील लॉ कॉलेजमधील कार्यालय अधीक्षकांना मे महिन्यात अद्विका शर्मा यांनी शेअर मार्केट गुंतवणूक बाबत माहिती दिली. त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील सामील केले. त्यांना लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांनी ती माहिती भरली. त्यानंतर काही रक्कम भरण्यास सांगितले. त्यांनी अद्विका यांच्या सांगण्याप्रमाणे कंपन्यांचे शेअर खरेदी केले आणि नफा मिळत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांची विक्री केली. त्यानंतर त्यांना मेघल शहा यांनीदेखील एक लिंक पाठवली. असे एकूण 10 लाख 29 हजार रुपये त्यांनी दोघांना पाठवले. त्यांनी गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पुन्हा 30 टक्के रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यांनी ती रक्कम भरली नाही. जून महिन्यात ते त्याच खात्यातून पैसे काढण्यासाठी गेले असता खात्याचा सायबर गुन्ह्यात समावेश असल्याने ते फ्रिज झाल्याची माहिती बँकेकडून मिळाली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्याने त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.







