| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील खोपटे येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण धर्मा म्हात्रे (72) यांचे नुकतेच निधन झाले आहे. संगीत रंगभूमीपासून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. कालांतराने संगीत नाटकांची क्रेझ कमी झाली आणि त्यानंतर त्यांनी ऐतिहासिक व सामाजिक नाटकातून भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या पश्चात एक पुत्र, दोन कन्या, सुन, जावई, नातवंडे, पंतवंडे, भाऊ-बहिणी असा आप्त परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवारी (दि.28) खोपटे येथील नाना नानी पार्क येथे होणार आहे. तर, उत्तरकार्य विधी रविवारी (दि.30) खोपटे येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती धनेश्वर म्हात्रे यांनी दिली.